मविप्र संस्थेकडून दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेस १२.५६ लाखांचा धनादेश सुपूर्द


नाशिक :- मविप्र संस्थेच्या जिल्हाभरातील शाळांकडून अंधनिधी म्हणुन जमा केलेल्या १२ लाख ५६ हजार रूपये रकमेचा धनादेश संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेच्या अध्यक्षा ॲड.विद्युलता तातेड,सेक्रेटरी शितल सुराणा,अनिल खालकर,मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके,डॉ डी डी लोखंडे,प्रा दौलत जाधव,डॉ नितीन जाधव उपस्थित होते. 
    मविप्र संस्था गेल्या २५ वर्षापासून अंधनिधीसाठी पुढाकार घेत आहे. सदर निधीचा वापर हा बेळगावढगा येथे सुरु असलेल्या अंध विद्यार्थ्यांच्या वसतिगृह तसेच वृद्धाश्रम बांधण्यासाठी केला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी