कर्मवीर अॅड. बाबुराव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त म.वि.प्र.समाज सेवानिवृत्त सेवक संघाच्या सभासदांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन


नाशिक :- मविप्र समाज संस्थेतर्फे मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी संस्थेचे माजी अध्यक्ष व सरचिटणीस कर्मवीर अॅड. बाबुराव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ना.जि.म.वि.प्र.समाज सेवानिवृत्त सेवक संघाच्या सभासदांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले असून सदर आरोग्य तपासणी शिबीरात महत्वाच्या आवश्यक असलेल्या 10 प्रकारच्या शारीरीक तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.सदर शिबीरासाठी मविप्रचे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, आडगाव, नाशिक येथे सकाळी 9.00 वाजता उपाशी पोटी उपस्थित रहावयाचे आहे. सदर आरोग्य तपासणी पूर्ण दिवस आहे. त्यासाठी नाश्ता व दुपारचे जेवण संस्थेमार्फत दिले जाणार आहे.ग्रामिण भागातून मध्यवर्ती बस स्थानकावर येणाऱ्या व नाशिक निवासी सभासदांनी सकाळी 8.30 वाजता संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे गेटवर हजर रहावे, त्यांना ने-आण करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची बस उपलब्ध राहील. बस नियोजित वेळेवर निघेल याची नोंद घ्यावी. त्यानंतर येणाऱ्या सभासदांनी मविप्र रुग्णालयात आपआपल्या सोयीनुसार उपस्थित राहावे.ना.जि.म.वि.प्र.समाज सेवा निवृत्त सेवक  सभासदांनी या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी 9 वा. मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत होईल.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन