भगवंत हा निराकार ज्योती स्वरूप - राजयोगिनी ब्रह्माकुमारी शक्ती दिदी
नाशिक रोड - भगवंत हा निराकार ज्योती स्वरूप असून त्याचे निवासस्थान पंचमहाभूतांच्या पलीकडे अर्थात ब्रह्मतत्त्व मध्ये आहे.या ठिकाणावरून भगवंताचे या सृष्टीवर दिव्य अवतरण होत असते भगवंताने दिलेल्या वचनानुसार जेव्हा जेव्हा धर्माची अति ग्लानी होईल दुराचार पापा चार अत्याचार अनाचार या सृष्टीवर मोठ्या प्रमाणात पसरेल अशा वेळेस स्वयं निराकार शिव परमात्मा या धर्तीवर अवतरीत होऊन सुखमय सृष्टी अर्थात सत्तयुगाची स्थापना करतात अशा सत्तयुगात आपल्याला सुद्धा श्रेष्ठ गती प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेचा राजयोग साप्ताहिक कोर्स करणे अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी शक्ती दिदी यांनी केले हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पेट्रोल पंप व्यावसायिक डॉ सुनिता टावरी व मनपा शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल नांगरे उपस्थित होते. 
कार्यक्रमात स्वागत ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सुनिता आठवले यांनी ब्रह्माकुमारी संस्थेसोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा दिला जेव्हा या ठिकाणी कार्यक्रम असतो त्यावेळेस मी आवर्जून उपस्थित राहते व येथे यायला मला खूप आवडते येथील वातावरण अतिशय प्रसन्न व आकर्षित करणारे आहे यातून नक्कीच सुख शांतता लाभते. तसेच नवीन कार्य करण्याची ऊर्जा येथून प्राप्त होते असे डॉ. सुनिता टावरी यांनी याप्रसंगी नमूद केले.
मुख्याध्यापक असलेले विठ्ठल नागरे यांनी सांगितले की ते आठ ते दहा वर्षापासून ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संपर्कात आहेत या ठिकाणी आल्यानंतर कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची एक अद्भुत शक्ती मिळते येथे शिकवण्यात येणारा राज योगा मेडिटेशन हा मनासोबत तनाला सुद्धा प्रफुल्लीत करणार आहे. ब्रह्मकुमारी भगिनींचे खूप चांगले मार्गदर्शन जीवनाच्या प्रत्येक वाटेवर मिळते असे नागरे यांनी याप्रसंगी नमूद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी केले. तर स्वागत नृत्य कुमारी खुशी हिने व हॅपी बर्थडे चे गीत ब्रह्माकुमार मोहन भाई यांनी गाऊन सगळ्यांमध्ये उत्साह प्रगट केला नाशिक रोड सेवा केंद्राच्या आधी फाउंडेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योती माता यांचा सुद्धा याप्रसंगी सत्कार व जन्मदिवस साजरा करण्यात आला 80 वर्ष वय असलेल्या ज्योती माता यांनी नाशिक रोड सेवा केंद्राच्या उभारणीसाठी विशेष योगदान दिलेले आहे कार्यक्रमात मोठ्या संख्येने ब्रह्मकुमारी सदस्य माता बंधू भगिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment