मखमलाबाद विद्यालयात मतदान जनजागृती अभियान

नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे नागरिकांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची जनजागृती व मतदान टक्केवारी वाढावी यासाठी विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी,पथनाट्य,सायकल रॅली,रांगोळी स्पर्धा,मेहंदी स्पर्धा,मतदान शपथविधी,पालक सभांद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.
इयत्ता ८ वी च्या सर्व वर्गांची गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.या विद्यार्थ्यांच्या हातात निवडणुक,मतदाना संदर्भात महत्वाची घोषवाक्ये होती. प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा दिल्या,तसेच मखमलाबाद स्टँड व गावातील चौकात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.याप्रसंगी मविप्र संचालक रमेश पिंगळे,स्कुल कमिटी अध्यक्ष,सदस्य व गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.पथनाट्यात इ.५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यामध्ये कु.सोहम पवार,कु.ओवी तुपे,कु.सोहम फडोळ,कु.प्रांजल सोज्वळ,कु.सोहम भुसारे,कु.स्वराली परदेशी,कु.कल्याणी काकड,कु.भाविका पाटील,कु.विधी,कु.प्रगती माळोदे,कु.सदाफ शेख,कु.तनुष्का,कु.जिविका लोणारे,कु.प्रज्ञा चांगले,कु.दिव्या जगताप या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या पथनाट्यास जेष्ठ शिक्षिका योगिता कासार,पल्लवी नवले,रोहिणी सोनवणे,संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.प्रभातफेरी व सायकल फेरीमध्ये प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,सर्व शिक्षकवृंदांनी सहभाग घेतला.मतदान जनजागृती विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली या विद्यार्थिनींना जेष्ठ शिक्षिका वर्षा पाटील,अश्विनी वडघुले यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.मतदान जनजागृतीसाठी पालक सभा घेण्यात आली.
 या सभेत प्राचार्य संजय डेर्ले यांनी सर्व पालकांना आपले व आपल्या कुटुंबातील,समाजातील सर्वांचे लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान कसे होईल याविषयी सर्व पालकांना आवाहन केले.मतदान जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य राजेंद्र गाडे,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,क्रिडा शिक्षक,एन.सी.सी.आर्मी नेव्हल शिक्षकवृंद,कलाशिक्षक, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला