कालिदास कलामंदिरात संगीत रंगपंचमी साजरी नवोदित कलाकारांचे सादरीकरण
नाशिक :- ए.एन.कारा ओके क्लब प्रेझेंट लाईव्हआर.डि.बर्मन हिट्स याच्या लोकप्रिय गीताचा "दम मारो दम" या संगीत मैफिलीची दमदार सुरुवात एक मैं और एक तू....या गीताने झाली. कालीदास कला मंदिर येथे विनामूल्य कार्यक्रमात नवोदित नाशिक मधील हौशी गायक कलाकारानी रंगपंचमीच्या पूर्व संध्याकाळी गीत,संगीत रंगपंचमी साजरी केली. या वेळी कुछ ना कहो,ओ हंसीनी,इस मोड से जाते हैं,ये जमीं गा रही है.आदी आर.डि.बर्मन याच्या आवाजातील लोकप्रिय गीते. क्लबचे डायरेक्टर सुनील कोचर व स्वराली चव्हाण याचे सह संजय गाडे,अमोल ताथे,देवेंद्र विभुते,विजय पोळ, बाळकृष्ण तेजाळे, उदय महादास,के.डी. पाटील,जयेश वाघ,के. सुरेश,अनिता खर्डे,अंजली पीचा,दिशा वालके,प्रमिला पाटील,अनिता पगार आदीं कलाकारांनी जुन्या रंगीत आठवणी जाग्या केल्या.प्रत्येक गीताना दर्दी रसिक श्रोत्यांनी टाळ्या, शिट्या वाजवून वंन्समोअर करत गायकांना प्रोत्साहन दिल्याने मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली.या वेळी कालिदास कला मंदिर हाऊस फूल झाले होते. संगीत संयोजन अभिजीत शर्मा यांनी व सह वाद्यवृंद कलाकारांनी साथसंगत केली.कार्यक्रमाला दर्दी रसिक श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे खुमासदार निवेदनअंजली चव्हाण यांनी केले.उपस्थितांचे स्वागत क्लबचे डायरेक्टर नितीन कुमार यांनी केले.जय जय शिव शंकर,जिंदगी मील के बीतायेगे,आणि सांगता यम्मा यम्मा ये खूब सूरत समा या गाण्यांनी झाली.या कार्यक्रमाला अँड.नंदकिशोर भुतडा,बाबुराव चव्हाण,वैशाली शहा, अशोक जगताप आदींसह गायक रसिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment