केटीएचएम महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळाने मिळवला १८ लाखांचा विक्रमी निधी

नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळाने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून रु.१८ लाख इतका विक्रमी सर्वाधिक निधी प्राप्त केला. या शैक्षणिक वर्षांमध्ये कमवा व शिका योजना, निर्भय कन्या अभियान, निवेदन कार्यशाळा, अभिनय कार्यशाळा ,मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा ,वृत्तपत्रविद्या प्रशिक्षण कार्यशाळा, राज्यस्तरीय नवोद्योजक स्पर्धा, सोलर लॅम्प मेकिंग वर्कशॉप, विद्यार्थी कवी संमेलन आणि खादी व ग्रामोद्योग प्रशिक्षण कार्यशाळा अशा सर्वाधिक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन वर्षभरात महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळाद्वारे करण्यात आले. सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी विद्यापीठाच्या लेखापरीक्षकांकडून नाशिक जिल्ह्याच्या विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांचे लेखापरीक्षण संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले होते. लेखा परीक्षणानंतर केटीएचएम महाविद्यालयाचे प्प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांना उपकुलसचिव डॉ मयूर चोरडिया व संचालक डॉ अभिजीत कुलकर्णी यांनी प्राप्त निधीचा धनादेश सुपूर्द केला व सर्वाधिक निधी प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे व विद्यार्थी विकास मंडळाचे अभिनंदन केले
 या सर्व उपक्रमांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.विविध उपक्रमांच्या आयोजनामध्ये विद्यार्थी विकास अधिकारी डॉ तुषार पाटील यांनी काम पाहिले तसेच श्रीमती वैशाली क्षीरसागर, डॉ सविता तिदमे, श्री सोपान देशमुख, श्री दीपक डेर्ले , श्री व्ही टी गडाख, श्री शाम थोरात यांनी सहकार्य केले. विद्यार्थी विकास मंडळाच्या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले,सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती देवराम मोगल, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन