हिंदू एकता फाल्गुन वद्य तृतीया हिंदू तिथी नुसार २८ मार्च रोजी साजरी करणार शिवजयंती



साधू संतांच्या साक्षीने पारंपरिक मार्ग वाकडीबारव येथून निघणार भव्य मिरवणूक
नाशिक :- महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा व शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळाच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथी नुसार साजरी करत आहेत कालही, आज,उद्या ही जयंती तिथी नुसार साजरी करणार आहेत.
      
दरवर्षी संपूर्ण राज्यात हिंदू तिथीने शिवजयंती सर्व जुने नवीन मंडळे साजरी करत आले आहे. परंतु मागील काही वर्षांपासून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तारखेचा घोळ सुरू आहे. आपले सर्व सण हे तिथी नुसार साजरे केले जातात शिवराय पण आमच्या साठी देव असून त्यांची जयंती सर्व शिवभक्त फाल्गुन वद्य तृतीय या तिथी नुसार यंदा २८ मार्च २०२४ रोजी येणारी जयंती साजरी करणार आहेत. म्हणून सर्व जुने नाशिक व शिवभक्त आपले दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीला साजरी करणार आहेत.
       
हिंदू एकता आंदोलन पक्ष नेहमी हिंदुत्व साठी समर्पित असून सर्व देशभक्तीपर कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी तसेच सर्व सण उत्सव ही साजरे करीत असतात. त्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तिथी नुसार येणारी शिवजयंती राज्यातील नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सोलापूर, पुणे, धुळे यासह अनेक जिल्ह्यात साजरी होणार आहे. मागील दोन वर्ष कोरोना मुळे मिरवणूक काढता येत नव्हती परंतु यंदा हिंदु एकता भव्य दिव्य मिरवणूक पारंपरिक मार्ग वाकडीबारव येथून साधू संतांच्या साक्षीने सायंकाळी पाच वाजता काढणार आहे.
       
तसेच शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौक, द्वारका सर्कल येथे सकाळी अकरा वाजता विविध मान्यवरांच्याउस्थितीत सालाबाद्रमाणे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करणार आहे. यात संपूर्ण चौकात भगवे ध्वज व पताका लावून भगवे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. आणि विद्युत रोषणाई लावून संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्यात येणार आहे. त्यासोबत आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहे. अशी महिती संस्थापक अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी दिली.
       
हिंदू एकता नेहमी शिवजयंती दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना आणि इतर महापुरुषाच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करते. असे करणारे हिंदू एकता आंदोलन पक्ष एकमेव उदाहरण आहेत. सर्वांनी तिथी नुसार येणारी शिवजयंती साजरी करावी असे आवाहन हिंदू एकता आंदोलन पक्ष करीत आहे.

यावर्षी तिथीनुसार शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी किरणसिंग पवार यांची निवड करण्यात आली आहे. यासोबत कार्याध्यक्ष अतुल रायसिंगे अनिल जाधव, उपाध्यक्ष किरण जाधव, खजिनदार प्रसाद बावरी विशेष कार्यकारी अधिकारी, मिरवणुक प्रमुख उमेश पाटील, सरचिटणीस स्वप्निल काथवटे, सनी अहिरे, राजू गाडगीळ विजय पवार, रोशन जाधव, सोनू कसबे, राजेश धुमाळ, बाळासाहेब थोरात, रोशन जाधव, देवा पवार, अभिजीत पवार, प्रेम पवार, भारत सदभैय्या, त्रिदेव सदभैय्या आदींची निवड करण्यात आली आहे. उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक परिश्रम घेत आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला