पेठ तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरणार यांच्या नियोजनामुळे लक्षांकापेक्षा अधिक फळबाग लागवड

पेठ :- कृषी विभाग पेठ मार्फत सन 2023 -24 या वर्षात महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत फळबाग लागवडीचे 180% उद्दिष्ट साध्य. महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभाग पेठ साठी 216 हेक्टर लागवडीचे लक्षांक देण्यात आलेले होते. या अनुषंगाने मोहन वाघ विभागीय कृषी सहसंचालक नाशिक, विवेक सोनवणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक,गोकुळ वाघ उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक व जगदीश पाटील कृषी उपसंचालक यांच्या मार्गदर्शनानुसार एक एप्रिल 2023 पासूनच 100% फळबाग लागवड उद्दिष्ट साध्य करण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले.त्यासाठी गावोगावी शेतकऱ्यांच्या सहभाग घेण्यात येऊन फळबाग लागवडीचे आर्थिक महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच कागदपत्रे जमा करण्यासाठी कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक यांच्यामार्फत शिबिरे घेण्यात आली.या शिबिरांमध्ये अनुरेख,तंत्र सहाय्यक,कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी कागदपत्रांच्या त्रुटींची पूर्तता करून तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आली.योजनेचे कामकाज पाहणाऱ्या ग्राम रोजगार सेवक, पी टी ओ आणि ऐ. पीओ.यांचेमार्फत जिओ टॅगिंग चे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर योजनेचे सीडीइओ यांच्या मार्फत युद्ध पातळी मस्टर काढण्याचे काम हाती घेण्यात आले.तसेच उत्कृष्ट लागवडीसाठी शेतकऱ्यांना चांगल्या नर्सरीतून कलमें उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यानंतर शास्त्रयुक्त पद्धतीने कलमे लागवडी बाबतचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले.विशेष बाब म्हणजे या वर्षात वनपट्टा धारक शेतकऱ्यांना फळबाग लागवड विशेष आंबा लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.वनविभाग,भूमि अभिलेख विभाग व महसूल विभाग यांच्याशी समन्वय साधून वनपट्टा धारक शेतकऱ्यांच्या फळबाग आंबा लागवडीचे अडचणी दूर करण्यात आल्या.अशाप्रकारे सर्वकष प्रयत्न विविध टप्प्यावर व सर्व आघाड्यांवर करण्यात आले.या सर्वांचा परिपाक म्हणजे तालुक्याची फळबाग लागवड 389 हेक्टर पर्यंत जाऊन पोहोचली.दिलेल्या 216 हे लक्षांका पेक्षा 180% फळबाग लागवड साध्य झाली. तसेच नाशिक विभागात सर्वात जास्त लागवड पेठ तालुक्याची साध्य झाली.या फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात निश्चितपणे वाढ होणार आहे.तसेच यापुढे पेठ तालुक्यात निर्यातक्षम आंबा बागा तयार करून आंबा निर्यात करण्याचे ध्येय असल्याचे अविनाश खैरनार तालुका कृषि अधिकारी यांनी नमूद केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला