ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच मविप्रचा ध्यास - ॲड.नितीन ठाकरे


सिन्नर :-  येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, जनता विद्यालय पांढुर्ली येथे शालेय इमारतीचे नूतनीकरण उद्घाटन, माजी जि.प.सदस्य कै. कमळाबाई मुकुंदराव वाजे स्मरणार्थ शालेय रंगमंच व माजी सरपंच व सभापती सिन्नर पंचायत समिती व मा.व्हा.चेअरमन नासाका लोकनेते शांताराम धर्माजी ढोकणे स्मरणार्थ ऑरो फिल्टर उद्घाटनाचा कार्यक्रम मविप्र सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे साहेब यांच्या हस्ते नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र तालुका संचालक कृष्णाजी भगत , तर प्रमुख अतिथी मविप्र इगतपुरी संचालक संदीप गुळवे होते. यावेळी व्यासपीठावर श्री.रामदास लांडगे, भालचंद्र जाधव, मविप्र शिक्षण अधिकारी डॉ. भास्करराव ढोके, पांढुर्ली गावचे सरपंच पंढरीनाथ ढोकणे, नंदूभाऊ पवार, रघुनाथ बरकले, विष्णू ढोकणे, भाऊसाहेब वाजे, पोपटराव वाजे, नितीन पांगारकर, गोपीनाथ पांगारकर, रामचंद्र तुपे, सखाराम हगवणे, उत्तम वाजे, दत्तू वाजे, भरत आरोटे, सुनील उगले, सोपान दिवटे, नंदकिशोर वाजे, सुभाष पवार आदि मान्यवर स्थानापन्न होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.आर.फटांगळे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थी हितासाठी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. जनता विद्यालय पांढुर्ली या विद्यालयातील पाच वर्ग खोल्यांचे नूतनीकरण, शालेय रंगमंच व ॲरो फिल्टर यांचे उद्घाटन मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांचे हस्ते संपन्न झाले.तसेच यावेळी सूरज वाजे यांचा व माणिक ढोकणे यांचा सत्कार ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मविप्र सदैव तयार असते. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून मविप्र आपले कार्य करते, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. त्याचप्रमाणे पांढुर्ली विद्यालयास ज्या दात्यांनी दातृत्व दाखवून वर्गखोल्या, आरो फिल्टर व शालेय रंगमंच बांधून दिला अशा सर्व दातृत्त्ववान लोकांचे आभार मानले व असेच सहकार्य त्यांनी विद्यालयास व संस्थेस सदैव असू द्यावे असे आवाहन केले. पांढुर्ली गावचे सरपंच पंढरीनाथ ढोकणे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांसाठी संस्थेने बस सेवा सुरू करावी अशी ग्रामस्थांच्या वतीने संस्थेकडे मागणी केली.मविप्र ज्येष्ठ सभासद रघुनाथ बरकले यांनी विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक निकड लक्षात घेता अनेक अडचणीवर चर्चा केली. त्याचप्रमाणे संस्थेने अजून पाच वर्ग खोल्या विद्यालयास बांधून द्याव्या अशी मागणी संस्थेकडे केली.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इगतपुरी तालुका संचालक ॲड.संदीप गुळवे यांनी संस्थेच्या वाटचालीत अनेक समाज हितैषी लोकांचें योगदान आहे.संस्थेचे अनेक प्रश्न नित्याने सोडविण्यासाठी व ते मार्गी लावण्यासाठी सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे व आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म.वि.प्र. समाजातर्फे सिन्नर तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. पांढुर्ली विद्यालयाची स्थापना ही कर्मवीर बाबुराव ठाकरे यांनी केली.आज सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.सिन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून सिन्नर येथे लवकरच विधी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.जी. हगवणे यांनी तर आभार प्रदर्शन जे. पी. पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समिती प्रमुख पी. व्ही. पानपाटील, श्रीमती अहिरे ए.जी, के.जी. भोसले, एस. वाय. अहिरे, के. जी. वागस्कर, डी.के. तांबे, एस. एस. गोवर्धने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला