संत निवृत्तीनाथांच्या मंदिरा समोरील सभामंडप बांधकामासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान तर्फे ३१ लाखाची मदत
त्रंबकेश्वर :- संत निवृत्तीनाथांच्या महाराज समाधिस ७९१ वर्षपूर्ति निमित्त सप्ताह सोहळा सुरू आहे. मंदिराचे नव्याने बांधकाम सुरु असून सभामंडपाचे बांधकामास निधीची मागणी देवस्थान कडून झाली असल्याने त्र्यंबाकेश्वर देवस्थान ट्रस्ट ने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ३१ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता.यापूर्वी ११ लाख दिले आहेत आज २० लाख रुपयांचा धनादेश अध्यक्ष निलेश गाढवे,सचिव सोमनाथ घोटेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
देवस्थान अध्यक्ष नितीन जीवने,सचिव सौ श्रीया देओचक्के,विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग ,सौ रुपाली भूतडा व स्वप्नील शेलार सत्यप्रिय शुक्ल,मनोज थेटे,यांनी धनादेश सुपूर्द केला. निवृत्तीनाथ देवस्थान मार्फत सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment