मविप्र नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
नाशिक :- दिनांक 24 मार्च 2024 जागतिक क्षयरोग दिन अर्थातच वर्ल्ड ट्यूबर्क्युलोसिस डे मराठा विद्या प्रसारक समाज संचलित नर्सिंग महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र सय्यद पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र सय्यद पिंपरी येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी, प्राथमिक आरोग्य केंद्र सय्यद पिंपरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.नाईकवाडे, डॉ. अहिरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. योगेश विधाते इ. मान्यवर उपस्थित होते.मविप्र नर्सिंग महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष जी.एन.एम विद्यार्थ्यांनी टीबी जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन केले व "होय आपण टीबी थांबवू शकतो", टीबी हारेगा, देश जितेगा, अशा घोषवाक्यांनी आजूबाजूच्या परिसरात जनजागृती केली तसेच विद्यार्थ्यांनी अत्यंत मार्मिक अशा भाषेत पथनाट्य सादर केले व सदर पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी क्षयरोग म्हणजे नक्की काय क्षयरोगावरील उपचारपद्धती व क्षयरोग कशा प्रकारे प्रतिबंध करू शकतो अशा विविध विषयांवर पथनाट्यद्वारे जनजागृती केली तसेच क्षयरोग निर्मूलनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी केलेल्या पथनाट्यास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी यांच्या वतीने प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.
सदर कार्यक्रमास मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी.डी.लोखंडे व नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या डॉ.पौर्णिमा नाईक यांनी क्षयरोग मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करावे असे प्रतिपादन केले व महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष जी. एन. एम. विद्यार्थ्यांनी केलेल्या क्षयरोग जनजागृती उपक्रमाबद्दल कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नर्सिंग महाविद्यालयातील कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक श्री.भूषण ठोंबरे व श्रीमती. नेहा केदारे यांनी विशेष मेहनत घेतली.सदर कार्यक्रमास सय्यद पिंपरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील गटप्रवर्तक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी,टेक्निशियन तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्षयरोग कार्यालय नाशिक येथील सौ. साधना बच्छाव यांनी तर आभार प्रदर्शन आरोग्य सहाय्यक अनिल भामरे यांनी केले.
Comments
Post a Comment