नाशिक महानगरपालिकेचे मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन

नाशिक :-  शहरातील मिळकत धारकांनी आपला मालमत्ता कर, पाणीपट्टी,व्यावसायिक गाळे आदींची थकबाकी त्वरित भरून नाशिक महापालिकेस सहकार्य करून नाशिक शहराच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे करण्यात आले आहे. दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत सुट्टीच्या दिवशी देखील भरणा स्वीकारला जाणार असून सर्व थकबाकीदारांनी थकबाकी भरून मनपास सहकार्य करावे.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारचे मालमत्ता कर पाणीपट्टी व्यवसायिक गाळे आदींची थकबाकी व स्वीकारण्यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरू राहणार आहे केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोग मार्गदर्शक सूचनेनुसार मालमत्ता पाणीपट्टी व्यावसायिक गाळे इत्यादींचे १००% वसुली होणे गरजेचे आहे.शहराच्या विकासात व शहरातील मोठे प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती, आगामी होणारा सिंहस्थ कुंभमेळा  शहरासाठी रिंगरोड इत्यादी सर्व बाबी पंधराव्या वित्तआयोगात समाविष्ट असून शहराच्या विकासासाठी १००%  वसुली पूर्ण झाल्यानंतर शासन मनपास अनुदान देणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता सर्व मिळकत धारक, सुज्ञ नागरीक, थकबाकीदार यांनी सन २०२३ ते २०२४ या आर्थिक वर्षाचे चार दिवस शिल्लक असून या कालावधीत आपली असणारी थकबाकी भरून मनपास सहकार्य करावे व नाशिक शहराच्या विकासासाठी हातभार लावावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांनी केलेले आहे.
एप्रिल पासून जप्तीची कारवाई
मार्च अखेर नंतर मोठी थकबाकीदार यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यांची चलत व स्थावर मालमत्ता जप्तीची कार्यवाही एप्रिलपासून सुरू केली जाणार आहे 
पाणीपुरवठा होणार खंडित
ज्या नळ कनेक्शन धारकांनी त्यांची थकबाकी अद्याप पर्यंत भरली नाही त्या थकबाकीदारांचे पाणीपुरवठा खंडित करण्याचे कार्यवाही मनपा कडून सुरू राहणार असून या थकबाकीदारांनी त्यांची थकीत पाणी पट्टी त्वरित भरून नाशिक महापालिकेस सहकार्य करावे असे  आवाहन उपयुक्त कर संकलन यांनी केलेले आहे.
मालमत्ता कर  लागू करून घ्यावा
नाशिक शहरातील ज्या मिळकत धारकांनी वाढीव बांधकामे केली आहेत अथवा वापरात बदल केले किंवा टेरेसचा अनधिकृत  वापर केला असे मिळकत धारकांनी स्वतःहून मनपास कळवून मालमत्ता कर लागू करून घ्यावा अन्यथा अशी अनाधिकृत गैरवापर करणाऱ्या मिळकत धारकांवर दंडात्मक व  कडक कारवाईचे धोरण नाशिक महापालिकेने सन २०२४-२५  या आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याबाबत दक्षता घेऊन मालमत्ता कर लागू करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
नाशिक महापालिकेच्या शहर विकासासाठी शहरातील मिळकत धारकांनी गाळे व्यवसायिकांनी आपली थकबाकी भरून नाशिक महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला