चांदवडला अहिल्यादेवी होळकर प्रेमी नागरिकांनी बसवला मुख्य रस्त्यावर पुतळा

चांदवड :- छत्रपती शिवाजी महाराजा नंतर रयतेसाठीचे राज्य जर कोणी केले असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी.याच अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने आणि सहवासाने पावन झालेली भूमी म्हणजे चांदवड. येथे होळकरशाहीत दख्खनेतील उपराजधानी होती. या चांदवड शहरात एक टोलेजंग असा प्रसिद्ध होळकरांचा राजवाडा तर आहेच. शिवाय मल्हारराव होळकर यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ताब्यात सातमाळा पर्वत रांगेतील पाच सहा किल्लेही होती.तसेच महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले रेणुका मातेच्या मंदिराचाही जिर्णोद्धार चांदवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून झाला. चांदवड येथे एक तलावही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्याकाळी केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चांदवड भूमीचा गौरवशाली इतिहास असतानाही मातेचे एखादे स्मारक या भूमीत नसावे यांची खंत होळकर प्रेमी नागरिक बोलून दाखवतात 
ही अनेकांच्या मनात खंत सलत होती. मात्र आज दिनांक 15मार्च 2024 रोजी काही इतिहास प्रेमींनी पुढे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा चांदवड शहराच्या मुख्य रस्त्यावर बसवण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला.आणि पुतळा बसविण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन