माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती मनपात साजरी
नाशिक :- नाशिक महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर व डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर, सहाय्यक आयुक्त डॉ.मयूर पाटील, अधीक्षक रमेश बहिरम,नितीन गंभीरे,जयश्री गांगुर्डे,सोनल पवार,वामन पवार,सोमनाथ कासार,संतोष निकम,संजय पटेल,पवन वझरे,राजू वर्मा,महेंद्र विभांडीक,सोमनाथ धात्रक, वीरसिंग कामे,सागर पीठे,यश बारगजे,सुजित देशमुख,दशरथ दप्तरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण तारांगण येथील यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यास कालिदास कला मंदिर व्यवस्थापक मोहन गीते,हिरजी राबडीया,कैलास बैरागी, पानबुडे,प्रवीण गुळवे,गायकवाड
गुंजाळ आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Comments
Post a Comment