संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाप्रमुख पदी शरद लभडे यांची नियुक्ती
नाशिक :- संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ऍड.मनोज आखरे व नाशिक जिल्हाचे निरीक्षक डॉ संदीप कडलग यांच्या निर्देशनुसार केंद्रीय कार्यकारणी सदस्य संदीप सावंत यांच्या हस्ते नवनियुक्त जिल्हाप्रमुख शरद लभडे यांची नियुक्ती शासकीय विश्रामगृह येते करण्यात आली.
शरद लभडे हे नाव शेतकरी व पुरोगामी चळवळीचे सक्रिय आंदोलक म्हणून राहिलेलं आहे आज त्यांची नियुक्ती जिल्हा प्रमुख म्हणून झाली असता संभाजी ब्रिगेड ही चळवळ नाशिक जिल्ह्यात तळागाळापर्यंत नक्कीच घेऊन जातील यात शंका नाही असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केले या कार्यक्रमप्रसंगी नितीन रोठे पाटील,विशाल अहिरराव, विक्रम गायधनी, मंदार धिवरे, राकेश जगताप, अनिल आहेर, अण्णा पिंपळे नितीन काळे, आदिल खान व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment