आपचे राज्य मिडिया प्रमुख चंदन पवार यांचा भाजपात प्रवेश


नाशिक :- आम आदमी पार्टीचे पूर्व राज्य मिडिया प्रमुख चंदन पवार यांनी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. आपच्या सर्व पदांचा त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे, चंदन पवार यांनी 2013 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता, त्यानंतर त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली होती.

यावेळी पवार यांच्यासोबत डॉ. शरद बोडके, राज्य समन्वयक, हेल्थ विंग,आप, महाराष्ट्र, बाळासाहेब बोडके आप, रवींद्र पवार पूर्व उपाध्यक्ष आप मालेगाव, महेंद्र अहिरे आप पदाधिकारी यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.

प्रवेशानिमित्त पवार यांनी मिडियाशी बोलतांना सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आपल्या कार्यकाळात 370 कलम हटविले, सीएए सारखा कायदा आणला, तीन तलाक आणि राम मंदिर यासारख्या प्रश्नांवर क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत, अनेक जनहिताच्या योजना त्यांनी राबविल्या. भारत देशाचे नाव त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले, यापुढेही देशाच्या भल्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळे त्यांच्या कार्यशैलीवर मोहित झालो आहे.

सत्तेवर असलेला पक्षात जनतेची कामे करता येतात हा अनुभव असल्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, यापुढें भाजपात जनतेचे काम करण्याची संधी मिळेल, जनहिताचे काम करण्यासाठी मी आम आदमी पार्टीत प्रयत्न केलेत तिच संधी मला भाजपाचे वरिष्ठ नेते देतील याची मला खात्री आहे, मी 10 टक्के राजकारण आणि 90 टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न करेन असे चंदन पवार म्हणाले. याप्रसंगी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्रीकांत भारतीय,अजित चव्हाण, उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन