हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने श्री राम प्रतिष्ठापना निमित्त जल्लोष कारसेवक सन्मानित

नाशिक : करोडो हिंदूंची स्वप्न होत साकार
कारण मंदिर वही बनायेंगे अशी घोषणा देत लाखो कार सेवकांनी ज्याचा केला होता अट्टाहास म्हणजे प्रभू श्रीरामांचे आयोध्येतील भव्य श्री राम मंदिर निर्माण हे स्वप्न हिंदू एकता आंदोलनाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पण बघितले होते. या स्वप्नाची स्वप्नपूर्ती होताना खूप आनंद होत आहे - रामसिंग भाऊ बावरी
आयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा  हिंदू एकता आंदोलन पक्ष तर्फे श्री टेंबलाई माता मंदिर द्वारका येथे सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री रामांची महाआरती करून कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर 21 किलो लाडूंचे प्रसाद वाटप करण्यात आले. या शुभ प्रसंगी १०१ दिवे लावत फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली. 

हिंदु एकता आंदोलन पक्ष नाशिक तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते कारसेवक पुष्पा शर्मा, शीतल घावटे, शामसिंग पवार, महादू बेंडकुळे, प्रतापसिंह पवार बावरी, अविनाश शिरसाट, रमेश मानकर, बाळा भोई, प्रशांत शिग्णे, किशोर नडगे, रवींद्र शिरसाट, विनोद बेलगावकर, भगवान शिरसाठ, सुनील भावसार, सुखदेव पवार, मिलिंद राजगुरू, रुपेश शिंदे, राजेंद्र जडे, अशोक ठाकरे, गुरुनाथ डहांके यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख मान्यवर गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक विजय धमाल, पोलीस उप निरीक्षक सपकाळे, हवा.निकम,डॉ.अनिल जाधव, पत्रकार समाधान शिरसाठ, प्रकाश खिची, समाधान निकम,हिरामण वाईकर उपस्थित होते. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रसाद बावरी, अनिल जाधव, किरणसिंग पवार, अतुल रणशिंगे, विजय पवार, कृष्णा आवटी, स्वप्निल काथवटे, बाळू मोरे, मंगल भाटी,उमेश पाटील, सुनील साळवे,पिंटू तसंबड, खर्डे,मंगला पवार, छाना बावरी, कृष्णा पवार, प्रेम पवार,राजू बावरी,राकेश धुमाळ सह असंख्य राम भक्त उपस्थित होते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन