Posts

वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी

Image
मुंबई, दि. २७ : हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित असणार आहे. तसेच ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असणार आहे. ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहरा विरहित) स्वरुपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन मालकाचा वाहन नोंदणी अर्ज करावा लागणार आहे. तसेच वाहन नोंदणी शुल्क व वाहन कराचा भरणा करून नोंदणी करता येणार आहे. सद्यस्थितीत खाजगी वाहनांच्या नोंदणीप्रमाणेच हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी या सुविधेमुळे वाहन वितरकांकडे करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता हलकी मालवाहू वाहने, यापुढे परिवहन कार्यालयात नोंदणीसाठी आणण्याची आवश्यकता राहणार नाही व नोंदणीची प्रक्रिया विनासायास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहन धारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. वाहन वितरकांस काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी dytccomp.tpt-mh@gov.in येथे ई-मेलद्वा...

मखमलाबाद विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा

Image
फोटो - मखमलाबाद विद्यालयात समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त प्राचार्य संजय डेर्ले, उपप्राचार्य राजेंद्र गाडे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी. मखमलाबाद - मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभहस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.कु.श्रद्धा भोर (इ.५वी ई) हिने समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्या विषयी माहीती सांगितली. अतीशय भाव विभोर होवून तीने काव्य रूपात महात्मा फुलेंविषयी शब्द सुमनांजली वाहीली.  "ज्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले मुली! ते ज्ञानदाते, ते विद्यादाते क्रांतीसुर्य महात्मा फुले!!". तसेच "तुम्ही पेटविलेली ज्ञानज्योती... आज स्त्री अनुभवत आहे! त्या ज्योतीचा लख्ख प्रकाश घरोघरी आज तेवत आहे!!" तस...