मखमलाबाद विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा
फोटो - मखमलाबाद विद्यालयात समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त प्राचार्य संजय डेर्ले, उपप्राचार्य राजेंद्र गाडे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.
मखमलाबाद - मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभहस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.कु.श्रद्धा भोर (इ.५वी ई) हिने समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्या विषयी माहीती सांगितली. अतीशय भाव विभोर होवून तीने काव्य रूपात महात्मा फुलेंविषयी शब्द सुमनांजली वाहीली.
"ज्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले मुली! ते ज्ञानदाते, ते विद्यादाते क्रांतीसुर्य महात्मा फुले!!". तसेच "तुम्ही पेटविलेली ज्ञानज्योती... आज स्त्री अनुभवत आहे! त्या ज्योतीचा लख्ख प्रकाश घरोघरी आज तेवत आहे!!" तसेच "खुल्या दिलाने स्वागत करण्या द्वार आमचे खुले! दैवत आमचे ज्योतिराव फुले!! महात्मा ज्योतिराव फुले!!!" हे गीत श्रद्धा गवळी,आरोही गामणे,तृषा मौर्या,रूचिका सिरसाट, श्रद्धा भोर इ.५वी क या मुलींनी सादर केले. या गीताला तुकाराम तांबे यांनी संगीत दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.आरोही गामणे हिने केले. त्यांना इ.५वी क च्या वर्गशिक्षिका उज्वला जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment