महायुतीच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रचाररॅलीस नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद




नाशिक  :- गेल्या दोन पंचवार्षिकात प्रा.सौ. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हा मतदारसंघात पूर्वापार भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. कायमच बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघाचे सूज्ञ मतदार येत्या निवडणुकीत मला विक्रमी मतदान करतील.असे प्रतिपादन भाजप महायुतीच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक मधून निघालेल्या प्रचार रॅली दरम्यान केले. रॅलीला मिळणारा भरघोस प्रतिसाद बघता यावेळीही मतदार मला दि.२० रोजी अनुक्रम २ पुढील कमळ या निशाणी समोरचे बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवतील असे सांगितले. तसेच यावेळी मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार, महिला,नवमतदार युवती यांनीही प्रसिद्धी प्रमुख ला प्रतिक्रिया देताना सांगितले की 
२०१४ व २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत आ.सौ.देवयानीताई फरांदे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. सलग दोन पंचवार्षिकात आमदार म्हणून जनसेवेची संधी त्यांना मिळाली. त्यांचे सोने त्यांनी केले आहे. या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी ' माझं नाशिक ; माझी जबाबदारी ' ही संकल्पना राबविली. समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करून त्यांच्या‌ मनातील अपेक्षेप्रमाणे मतदारसंघात विकास आराखडा तयार केला. तो पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. म्हणून आम्ही कायमच प्रा.फरांदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.प्रसिद्धी प्रमुख प्रतिनिधीने नाशिक मध्य मतदारसंघातील विविध समाज घटकांशी थेट संवाद साधला. तेव्हा सर्वांनी भारतीय जनता पक्ष - महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनाच आपली पसंती असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. महिला मतदार म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे आमचे सशक्तीकरण होत आहे.जनतेच्या हक्काच्या पैशातून आम्हाला दरमहा १५०० रुपये मिळवून देण्यासाठी आमदारांनी प्रयत्न केले. मतदारसंघात महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण एक महिला आमदार म्हणून त्यांनी केले आहे. विविध भागात मंदिरे बांधून दिली. त्यामुळे भक्तीमय वातावरण प्रसन्नता, शांतता निर्माण झाली आहे. भजन, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम सातत्याने होतात. सर्वांमध्ये आपुलकीचा ओलावा व एकोपा वाढीस लागला आहे. मुलांवर चांगले संस्कार होतात.आम्ही समाधानी आहोत.
प्रभाग ७ मधील महापालिकेच्या भाजी बाजार सभागृहात महिला बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल उभारण्याची महत्वाकांक्षी योजना. प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनी आखली. ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून ही योजना राबविण्यात येत आहे. या मॉलच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना, कलाकौशल्याला बाजारपेठ मिळेल.येथे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, उद्योजकता विकास मार्गदर्शन देखील मिळेल. सामाजिक विकास होऊन कुटुंबे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी,आत्मनिर्भर होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपेक्षेनुसार विकास घडेल असे यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले.


प्रभाग ७ मध्येही युवकांचा, 
नारीशक्तीचा झंझावात प्रा. सौ. देवयानी फरांदे यांची भव्य प्रचार रॅली. शेकडो मोटासायकलस्वार युवक आणि असंख्य महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी प्रभाग क्र. ७ चा परिसर दणाणून सोडला. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी १५० पेक्षा जास्त दुचाकी वाहने सहभागी झाली. कमळ चिन्हाने सजवलेल्या प्रचाररथावर प्रा. सौ. देवयानी फरांदे यांच्यासह संयोजिका व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्वाती भामरे, हिमगौरी आडके, माजी नगरसेवक योगेश हिरे, गोपाल राजपूत, निक्की पवार, मंडल अध्यक्ष वसंत उशीर, युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय गांगुर्डे आदींसह नेते तसेच मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अशोकस्तंभ येथे नाशिककरांचे श्रध्दास्थान असलेल्या ढोल्या गणपती मंदिरात बाप्पांचे दर्शन घेऊन प्रचारफेरीला प्रारंभ करण्यात आला. प्रभाग ७ मधील रॉकेल गल्ली, घारपुरे घाट, गुरांचा दवाखाना परिसर, विठ्ठल पार्क, गोळे कॉलनी, मल्हार खाण, पोलिस हेड क्वार्टर, जुनी व नवीन पंडित कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, धनवटे कॉलनी, मुरकुटे कॉलनी, बाल गणेश मंदिर आदी भागांतून रॅली आल्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते व सहकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी घोषणा, प्रचार गाण्यांनी परिसर दणाणून गेला. नंतर मॅरेथॉन चौक, जुना गंगापूर नाका, मारुती मंदिर, सप्तशृंगी कॉलनी, विघ्नेश्वर मंदिर, कुसुमाग्रज स्मारक आदी भागातही रॅलीला भरघोस प्रतिसाद मिळाला.ठिकठिकाणी 
महिलांनी स्वागत व औक्षण करून शुभेच्छा दिल्या.जय श्री राम जय श्री राम घोषणा देण्यात आल्या रॅली पुढे श्रीरंगनगर, गोकुळ वाडी, गुरुदत्त नगर, चव्हाण कॉलनी, विसे मळा, सहदेव नगर, दत्त चौक, दादोजी कोंडदेव नगर, शांती निकेतन कॉलनी, प्रमोद नगर, अरिहंत नर्सिंग होम, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर मार्ग, चैतन्यनगर, तिरुपती टाऊन, आनंद नगर, अयोध्या कॉलनी, अथर्व मंगल कार्यालय, विश्वास बँक परिसर, मधुर स्वीट्स, भारत बेकरी, राम नगर, नरसिंह नगर, नक्षत्र कॉलनी, आकाशवाणी चौक, नेर्लेकर हॉस्पिटल लेन, स्वामी समर्थ मार्ग, शहीद चौक, अभ्युदय कॉलनी, एसटी कॉलनी, श्रमिक कॉलनी, प्रसाद मंगल कार्यालय परिसर व चौक, तुळजभवानी मंदिर, कर्मवीर बाबुराव ठाकरे चौक, थत्ते नगर, योगविद्याधाम, बीवायके कॉलेज चौक, पाटील लेन क्रमांक ३ व ४, लक्ष्मी नगर, पाटील पार्क, विद्या विकास चौकमार्गे सागर स्वीट्सजवळ आल्यावर प्रचारफेरीचा समारोप करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन