मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचार सभांचा धुराळा
येवला,दि.१५ नोव्हेंबर :- येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गटाचे अधिकृत उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ शनिवार दि.१६ व रविवार दि.१७ डिसेंबर रोजी भव्य प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार सभांना अभिनेते सयाजी शिंदे व अभिनेते भाऊ कदम यांची उपस्थिती असणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ शनिवार दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता अंदरसुल, सायंकाळी ४ वाजता पाटोदा येथे तर सायंकाळी ६ वाजता अभिनेते भाऊ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत लासलगाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात भव्य सभा पार पडणार आहे. तसेच रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी येवला शहरातील शनीपटांगण येथे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा होणार आहे.
या प्रचार सभेस मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुती घटक पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment