मध्य नाशिक मतदारसंघात प्रा.देवयानी फरांदे हाट्रीक करणार नागरिकांच्या प्रतिक्रिया

नाशिक :-  विधानसभा निवडणुकीतील मतदानाला दोन दिवस राहिलेले आहेत. अशा वेळी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या मनात काय चालले आहे. याचा कानोसा प्रसिद्धी प्रमुख ने घेतला असता मतदारांनी सर्वांगीण विकास करणाऱ्या सुसंस्कृत आणि पक्षाशी, मतदारांशी एकनिष्ठ असणाऱ्या प्रा.सौ. देवयानी फरांदे यांनाच आपला शतप्रतिशत पाठिंबा असल्याचे निःसंदिग्धपणे सांगितले. प्रा. देवयानी ताई फरांदे हॅटट्रिक करणार,असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले 
गेल्या दोन पंचवार्षिकात भाजपच्या सुसंस्कृत, उच्चशिक्षित असलेल्या प्रा.फरांदे यांनी आमच्या मध्य नाशिक मतदासंघाचे कुशल नेतृत्व केले. सर्वांगीण विकासाला त्यांनी प्राधान्य देऊन सातत्याने नवनवीन योजना राबवल्या. मोठ्या प्रमाणावर निधी आणला व त्याचा पूर्णपणे विनियोग केला. विविध समाजमंदिरे बांधली. सुमारे २५ पेक्षा जास्त मंदिरांचा जीर्णोध्दार केला. आमचे मत विकासाला, महायुतीला, प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनाच. 
खाली नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया 


                        डॉ. चंद्रशेखर नामपूरकर
            (प्रभारी,भाजपा वैद्यकीय आघाडी) 

आमचे मत उच्चशिक्षीत उमेदवारालाच 
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात प्रा. देवयानी फरांदे या उच्चशिक्षीत, अभ्यासू उमेदवार आहेत. त्यांना १० वर्षे आमदार असण्याचा अनुभव आहे. मतदारसंघातील विविध विकासकामे करुन त्यांनी मतदारांची मने जिंकली आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराने अनेक पक्ष बदलून विश्वासघात केला. केवळ निवडणूक आली की त्यांना मतदारांची आठवण येते. खालच्या पातळीवर राजकारण करून कोणी मतदारांचा विश्वास मिळवू शकत नाही हे मतदानाद्वारे महाविकास आघाडीला दाखवून देऊ.


                                      कृणाल पटेल
                                      ( नोकरदार)
शाश्वत विकासासाठी आमचे मत
मतदासंघातील विकासासाठी आ. देवयानी फरांदे यांनी शासनाकडून मोठा निधी आणला. सातत्याने पाठपुरावा करून अनेक कामे करून मतदासंघाचा कायापालट केला. त्यांनी केलेली सर्वांगीण विकासाची कामे जनतेसमोर ठळकपणे अधोरेखित आहेत. प्रा. फरांदे यांच्याकडे व्हीजन असून पुढील काळातील कामांचा चोख आराखडा त्यांनी आखला आहे. त्यानुसार अधिक गतीने नाशिक मध्य मतदारसंघ हा आदर्श मतदारसंघ ठरेल. म्हणून आमचे मत शाश्वत विकासासाठीच आम्ही देणार.


                                    सागर नेरपगार
                                   ( व्यावसायिक )
विकासपर्वाला आमचा भरघोस पाठिंबा
माझं नाशिक, माझी जबाबदारी हा वसा घेऊन प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य मतदारसंघात गतिमान विकास केला. त्यांच्या कौशल्यपूर्ण कार्यप्रणालीने प्रा.फरांदे यांनी समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले आहे. ज्येष्ठ नागरिकांपासून नवमतदार युवकांच्या आशा आकांक्षा त्यांनी गेल्या दोन पंचवार्षिकात सर्व शक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. अशा वविकासपर्वाला आमचा भरघोस पाठिंबा आहे.


                                       मंदा गोसावी
                ( घरेलू कामगार, बजरंग वाडी) हिंदूत्ववादी विचारांना आमचे पाठबळ 
प्रखर हिंदुत्ववादी विचार असणाऱ्या प्रा.सौ. देवयानी फरांदे यांनी उघडपणे विरोधकांना वेळोवेळी करारा जबाब आपल्या कृतीद्वारे दिला आहे. व्होट 
जिहादच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. म्हणून प्रा.देवयानी फरांदे या हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन नाशिक मध्य मतदारसंघाचे कुशल नेतृत्व करीत आहेत. अश्या हिंदूत्ववादी विचारांना आमचे पाठबळ असून त्यांना मताधिक्याने विधानसभेत पाठवणार.


                           प्रिया राहुल कुलकर्णी 
         ( फॅशन डिझायनर, द्वारका, नाशिक ) 

आमच्या लाडक्या बहिणीला आमचे मत
महिला सशक्तीकरण, सबलीकरण अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महायुती सरकारने सुरू केली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा करून आम्हा गरजू माता भगिनींना हा हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आमच्या खात्यावर पैसे जमा झाले. लेकराबाळांची दिवाळी आनंदाची झाली. आता आम्हाला संधी आली आहे. उपकारांची परतफेड म्हणून आम्ही व आमचे कुटुंबीय, मैत्रीणी
लाडक्या बहिणीला म्हणजेच फरांदे यांना आमचे मत देणार.

                              गीता अर्जुन काळे
                      ( गृहिणी, मल्हार खाण )

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला