कर्मवीरांच्या स्वप्नपूर्तीस होणार मदत - सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे

फोटो 
निफाड : येथील कर्मवीर ग. दा. मोरे महाविद्यालयातील संगणक प्रयोगशाळा कक्षाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे,समवेत विविध मान्यवर

मविप्र निफाड महाविद्यालयाला संगणक प्रयोगशाळेचे दान 

निफाड : कर्मवीरांच्या विचारांचा वसा आणि वारसा जतन करीत अनेक संस्थाप्रेमी, विचारवंत, दानशूर व्यक्ती वेळोवेळी मविप्रला सहकार्य करीत आहेत. त्यांचे कार्य हे निश्चितच बहुजन समाजाच्या विकासाला हातभार लावत आहे. त्यांच्या सहकार्यामुळे कर्मवीरांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला. 
निफाड येथील कर्मवीर ग. दा. मोरे महाविद्यालयातील संगणक प्रयोगशाळा कक्षाच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल, संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक शोभाताई बोरस्ते, संचालक अमित बोरसे, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, संचालक नंदकुमार बनकर, संचालक रमेश पिंगळे, संचालक जगन्नथ निंबाळकर, भागवत बाबा बोरस्ते, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, प्राचार्य डॉ. सुरेश जाधव, डॉ. ए. के. शिंदे, डॉ. एस. ए. खैरनार, डॉ. ज्ञानोबा ढगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सोनेवाडी येथील पीपीएफ एक्सपोर्ट कंपनीचे चेअरमन अमित पडोळ यांनी महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळा कक्षाच्या निर्मितीसाठी रूपये 18 लाख देणगी दिली. त्याबद्दल मविप्र समाज संस्था आणि निफाड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात सभापती बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले, समाजातील अनेक दानशूर मविप्रला वेळोवेळी सहकार्य करीत आपले योगदान देत आहेत. त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून इतरांसाठी दिशादर्शक आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घेत मविप्र समाजाच्या विकासात योगदान द्यावे. निफाड परिसराततील शेती विकसित होत आहे. त्यामळे शेती व्यवसाय आणि शिक्षण यांची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. विविध तंत्रज्ञानाचा वापर कृतीत उतरविण्यासाठी मविप्र संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना अमित पडोळ म्हणाले, कर्मवीरांनी मविप्र समाज संस्थेच्या माध्यमातून समाजाला शिक्षणाची संधी निर्माण करून अनेकांना सुशिक्षित करीत त्यांचे जीवन समृद्ध केले. याच कर्मवीरांच्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आमचा विकास झाला. त्यांच्या ऋणातून बोध घेत त्यांच्या आदर्श कार्यास मदत करताना मला मनस्वी आनंद होत आहे, यापुढेही काही आवश्यकता निर्माण झाली तर निश्चितच सहकार्य करीत राहिल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी मनोगतात अमित पडोळ यांच्या सहकार्याबददल समाधान व्यक्त केले. प्राचार्य डॉ. सुरेश जाधव यांनी प्रास्तविकात महाविद्यालयाचे विविध उपक्रम व विकास कार्य याची माहिती देत, देणगीतून उभारलेल्या संगणक कक्षा बाबत आनंद व अभिमान व्यक्त केला.
महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक मकरंद २०२३-२४ चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शालेय समितीचे सर्व सदस्य निफाड व परिसरातील मान्यवर, सभासद, पत्रकार, संस्था हितचिंतक, पालक, सर्व प्राध्यापक,सेवक वृंद,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन डॉ. महेश बनकर यांनी केले तर डॉ. सुसान लॉरेन्शिया यांनी आभार मानले.

ॲड. नितीन ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने केक कापून सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच,18 लाखांचे दान देणारे अमित पडोळ, महाविद्यालयाला जमीन दान करणारे गजानन उपाध्ये, सॅनिटरी मशीन भेट देणारे सदाशिव पवार व पूनम पवार-ठाकरे, राष्ट्रीय क्रीडा पातळीवर निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थी आणि डॉ. महेश बनकर यांना पीएच.डी. मिळाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला