मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे रविवारी मराठा वधू-वर परिचय मेळावा
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक व मराठा शुभ लग्न डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि.१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे भव्य मराठा वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे, मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले व सर्व पदाधिकारी, तालुका सदस्य, सेवक सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अधिक माहितीसाठी हेमंत पगार (मो. 8275583262 ) यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त समाजबांधवांनी मेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन मविप्र समाज, नाशिक आणि मराठा शुभ लग्न डॉट कॉम यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment