समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ महिला बचतगटांचा तुळजा लाॅन्स येथे भव्य मेळावा
बचत गट मेळाव्यात महिलांचा ठाम निर्धार
नांदगाव,दि.१६ नोव्हेंबर:- आम्हा महिलांच्या समस्यांची जाण फार कमी जणांना आहे. आमचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि बचत गटाच्या माध्यमातून आमचे हात बळकट करण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ आग्रही आहेत. बचत गट सक्षम करतानाच आम्हाला विविध प्रशिक्षण देण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे ‘यंदा फक्त समीर भाऊच आमचे उमेदवार’, असा ठाम निर्धार शेकडो महिलांनी केला. निमित्त होते महिला बचत गट मेळाव्याचे.
नांदगाव येथील दहेगाव रोडवरील तुळजा लॉन्स येथे जातेगाव व साकोरा गटाचा तर नस्तनपूर येथील शनी मंदिर परिसरात न्यायडोंगरी गटाचा महिला बचत गट मेळावा संपन्न झाला. डॉ. शेफाली भुजबळ आणि अभिनेत्री सोनाली पाटील यांनी या मेळाव्याला मुख्य मार्गदर्शन केले. यावेळी अपर्णा देशमुख, विजय पाटील, प्रताप गरुड, विनोद शेलार, प्रसाद सोनवणे, गोरख जाधव, शिवाजी जाधव, पंढरीनाथ गायकवाड, अमित पाटील, सोपानराव पवार, दादा पगार, बाळासाहेब देहाडराय, वाल्मिक टिळेकर, डॉ. वाय पी जाधव, राजेंद्र लाठे, दीपक खैरनार, नारायण पवार, संदीप पवार, सचिन देवकाते, विश्वास अहिरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण, कायमस्वरूपी महिलांना रोजगार, शेतीपूरक उद्योग व व्यवसाय कसा सुरू करता येईल, बचत गटांचा आर्थिक विकास कसा करता येईल, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी कसे प्रयत्न करता येतील आदींबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. तर उपस्थित महिलांच्या शंकांचेही निरसन करण्यात आले. महिला तयार करीत असलेल्या विविध वस्तू, पदार्थ आणि उत्पादने यांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल असे डॉ भुजबळ यांनी सांगितले. तर अभिनेत्री पाटील म्हणाल्या की, राजकारणी आणि नेते खूप आहेत. मात्र विकासाचे व्हिजन असलेले फार थोडे आहेत. समीर भुजबळ त्यातीलच एक आहेत. जर तुम्हाला विकास हवा असेल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती करायची असेल तर भुजबळ यांना विजयी करावे. येत्या २० तारखेला शिट्टी या निशाणी शेजारील बटन दाबून विकासाला मत द्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment