संविधान बदलाचे खोटे नरेंटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसला जनताच धडा शिकवणार - किरेन रिजीजू
नाशिक :- "पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान करून दुखविणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी भाजपा संविधान बदलणार असल्याचा खोटा आरोप करीत आहेत. मी स्वतः बौद्ध आहे. अनुसूचित जाती - जमातीच्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसला आमची जनता धडा शिकवेल. महाराष्ट्रात महायुतीला मतदार प्रचंड बहुमताने विजयी करतील !" असा विश्वास संसदिय कामकाज मंत्री किरण रिजीजू यांनी येथे व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण,भाजपाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, उत्तर महाराष्ट्र भाजप मीडिया सेंटरचे प्रमुख व प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, महानगर प्रमुख प्रशांत जाधव, दिंडोरी लोकसभा प्रमुख, बाळासाहेब सानप, महानगर उपाध्यक्ष कुणाल वाघ, भाजप नाशिक महानगर सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, ॲड. श्याम बडोदे, नाशिक मध्य विधान सभा प्रभारी प्रवांशी आमदार अमुल भट्ट, दिंडोरी विधानसभा प्रभारी प्रवासी आमदार अमित ठाकर, प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष गणेश कांबळे, नाशिक भाजप महानगर प्रसिद्धीप्रमुख राहुल कुलकर्णी, मा नगरसेवक भगवान दोंदे आदिंसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना.किरण रिजीजू यांनी सांगितले की, " मी महाराष्ट्रामध्ये नेहमी येत असतो. गेल्या महिन्यात विजयादशमीच्या कार्यक्रमास मी नाशिकला आलो होतो.महाराष्ट्र हे देशातील एक मोठे प्रगतीशील राज्य आहे. मुंबई, नागपूर,विदर्भ, नाशिक येथे मी अनेकदा आलेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रात माझे दौरे झाले असून राज्यात महायुतीला अत्यंत चांगले वातावरण आहे. कुठेही काँग्रेसला स्थान असल्याचे दिसत नाही. नुकतेच राहुल गांधी यांनी नागपूरला नकली संविधान पुढे करून अपप्रचार सुरू केला. त्याचा भंडाफोड करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा मोठा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर पुढे पुढे जात आहे. पस्तीस ते चाळीस वर्षापासून मी विविध गोष्टी पाहत असून 2014 पासून देशाचा जो विकास झाला तितका विकास यापूर्वी कधीही झाल्याचे पाहण्यात आले नाही. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग असेल किंवा बुलेट ट्रेन चा प्रकल्प असेल, मुंबईतील विविध विमानतळ असतील इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीचे कार्य मोठ्या प्रमाणावर केंद्र व राज्य सरकारने केले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा वाट्याने विकास करण्याचे श्रेय विषय 2014 नंतर आलेल्या महायुती सरकारला द्यावे लागेल. " असे ते म्हणाले.
"मी जिथे राहतो तो चीनच्या सिमेलगतचा प्रदेश आहे. सीमेपर्यंत जाण्यासाठी पूर्वी सैन्याला पाच पाच दिवस पायी चालावे लागत असे. सर्व युद्ध साहित्य घेऊन तिथपर्यंत जाणे कष्टाचे काम होते. आता मात्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तेथे रस्ते तयार केले असल्याने सैनिकांची सुविधा झाली आहे. त्यामुळे फौजेमध्ये उत्साह आहे. 1962 मध्ये चीनने केलेल्या आक्रमणात हजारो सैनिक धारातीर्थी पडले. भारताचा अपमान झाला. त्यानंतर मोठी सुधारणा मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केली आहे. विविध सुधारणांचा लाभ शेतकरी व समाजातील विविध घटकांना मिळत आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, व अजित पवार, यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. गरिबांच्या खिशात पैसा खेळू लागला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे जमा होत आहेत." केंद्र सरकारने देशाबरोबर परदेशात देखील भारताची चांगली प्रतिमा तयार केली असून मी जवळजवळ 155 देशात भ्रमण केले आहे. 1980 पासून मी विविध देशांमध्ये प्रवास करीत आहे. पूर्वीची स्थिती व आजची स्थिती यात जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. भारताकडे पाहण्याची विविध पाश्चात्य देशातील नेते व नागरिकांची दृष्टी बदलली आहे. आता ते भारताकडे आदराने पाहत आहेत. कुठेही गेले तरी नेता म्हणूनच नव्हे तर भारताचा नागरिक म्हणून मोठा सन्मान मिळतो."असे त्यांनी सांगितले. "जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करून सरकारने भारताचे संविधान तेथे लागू केले आहे. त्यामुळे तेथील जनतेला आरक्षण लागू झाले आहे. यापूर्वी तेथे आरक्षण नव्हते. आणि आता विरोधी पक्ष तेथे पुन्हा 370 कलम लागू करण्यासाठी देशद्रोही भूमिका घेत आहे. याबद्दल त्यांना जाब विचारावा असे आवाहनही त्यांनी पत्रकारांना केले.
"1951 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी पत्रातून आपले दुःख व्यक्त केले आहे. निवडणुकीत काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय होऊ दिला नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी घटनेचे प्रिएम्बल बदलले. आता मात्र त्यांना घटनेचा खोटा कळवळा आला असून संविधानाच्या बनावट प्रति दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये. त्यांच्या या कृत्याचा बदला आम्ही घेऊ! असे सांगून अनुसूचित जाती जमातीची जनता लोकसभेमध्ये त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडली. मात्र सर्वांना सर्वकाळ फसवता येत नाही. आता जनता त्याला बळी पडणार नाही असे ते म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण हिंदुत्वाला पोषक असे होते. आता मात्र त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्याकांच्या लांगुलचालनाचे धोरण स्वीकारले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून ते बसत आहेत. हे आता जनतेच्या लक्षात आले असल्याने जनता त्यांना आपली जागा दाखवील. देशासाठी अपार कष्ट सोसणाऱ्या सावरकरांचा अपमान राहुल गांधी करीत असून त्यांच्याच सहकार्याने शिवसेना निवडणूक लढवीत आहे ही गोष्ट खेदजनक आहे. " असे रिजीजू यांनी स्पष्ट केले.
"विरोधी काँग्रेस व अन्य पक्षांकडे कोणतेही लक्ष्य नाही. भाजपाकडे मात्र 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचे लक्ष्य आहे. यामुळे संपूर्ण जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहत असून स्थानिक प्रश्नांबाबत येथील आमदार व लोकनेते जनतेच्या भावना जाणून विकास कामे करीत असल्याने नाशिक व उत्तर महाराष्ट्रातून महायुतीला भरघोस यश मिळेल." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment