१) विकासपर्व मध्ये मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती
नाशिक :- प्रिय मतदार बंधू-भगिनींनो, आपण मला सलग दोन पंचवार्षिक आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपली हृदयपूर्वक आभार मानते आपला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी गेल्या पाच वर्षात अहोरात्र मेहनत घेतली दररोज अठरा-अठरा तास काम करून जनसामान्यांची सेवा केली. शासनाच्या विविध विभागांमधून मध्य नाशिक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न केला.गरीब,शोषित, दुर्लक्षित,वंचित, अल्पसंख्यांक आणि एकूणच रंजल्या गांजल्या घटकांच्या वेदना जाणून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधिमंडळात वेळोवेळी आवाज उठवला.त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक मेहनत घेतली त्यासाठी समाधान, आयुष्यमान भारत, यासारखी शिबिरे घेण्यात आलीत. या घटकांपर्यंत शिबिरांच्या माध्यमातून शासकीय योजना पोहोचवण्यात आल्या. प्रश्न सुटल्यानंतर गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील फुललेला आनंद हीच माझ्या कामाची पावती मी समजली या कामांसाठी मला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माझे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आणि माजी पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, यांच्यासह पक्षातील सर्वच नेतेगंणांचे मार्गदर्शन मला लाभत राहिले, तुमच्यासारखे सुजाण विकासाच्या प्रक्रियेत स्वतःहून सहभागी होणारे आणि वेळोवेळी कर्तव्यबुद्धीने हक्काने माझ्याशी सुसंवाद साधणारे नागरिक माझ्या सतत सोबत असल्याने कामाला हुरूप येत गेला. या पंचवार्षिक कालखंडाच्या समाप्तीला, आपल्यासमोर माझ्या कार्यकाळातील विकास कामांचा आढावा पुन्हा सादर करताना मला विशेष समाधान वाटत आहे.खरेतर गेल्या पाच वर्षातील सुरुवातीचे सुमारे तीन वर्ष कोविडच्या संकटात गेले मायबाप जनता अडचणीत आहे. हे लक्षात आल्यावर मी तडक मदतीला धावून गेले या काळात कोविडग्रस्तांना मदत असो वा प्रशासकीय कामकाजाला सहकार्य असो माझ्या परीने जितकी सेवा देता येईल ती मी दिली. जिवाची परवा न करता सातत्याने मतदारसंघात मदतीसाठी फिरत असल्याने मलाही या आजाराने ग्रासले. एकदा नव्हे तर दोनदा दोन्ही वेळा आजाराने गंभीर स्वरूप धारण केले होते.पण आपल्या सदिच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी होते म्हणून मी वाचले. तेव्हाच ठरविले उर्वरित आयुष्य पूर्णत: जनतेच्या सेवेसाठी अर्पण करायचे. त्यादृष्टीने मी कार्यमग्न झाली. तरुणाईमध्ये वाढलेल्या व्यसनाधीनतेला विशेषत:ड्रग सेवनाला आळा बसण्यासाठी मी सातत्याने विधानसभेत आवाज उठवला पोलीस प्रशासनाकडेही सातत्याने पाठपुरावा केला.इतकेच नाही तर ड्रग्स विक्रेत्यांची यादीच मी पोलिसांकडे दिली त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये मध्ये आले अजूनही आपल्याला हा लढा पुढे न्यायचा आहे. मराठा आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येणारे वस्तीगृह असो विविध समाज मंदिरे असो या प्रत्येक कामात मी जातीने लक्ष घालत विषय मार्गी लावले.नाशिकच्या वैभवात भर टाकणारे अनेक प्रकल्प या पाच वर्षाच्या काळात मंजूर झाली सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पाच वर्षाच्या काळात मौनी आमदार म्हणून मला कोणी टोकू शकले नाही कारण असे एकही अधिवेशन झाले नाही. की,त्यात मी नाशिकच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही.यापुढेही आपल्या सदिच्छांची शिदोरी घेऊन अशीच कार्यरत राहील असा शब्द आपणास नतमस्तक होऊन देते. मध्य नाशिक मतदारसंघात मध्यवर्ती ठिकाणी मराठा समाजातील हजार विद्यार्थ्यांसाठी दहा मजली वस्तीगृह सारथी संस्थेच्या माध्यमातून त्रंबकरोड परिसरातील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर होत आहे.सदरचा प्रकल्प १५८ कोटी ९९ लाख९० हजार रुपयांचा होणार आहे.तसेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्रंबकरोडवरीलच दुग्धव्यवसाय विकास विभाग यांच्या मालकीच्या क्षेत्रापैकी १.१० एकर (५०००चौरस मीटर) या जागेचा ताबा धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी घेण्यात आला आहे. बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ही वस्तीगृह साकारण्यात येणार आहे.या इमारतीसाठी ४३ कोटी ५२ लाख चार हजार सातशे रुपयांना मंजुरी घेण्यात आली आहे. इंदिरानगर येथे जयप्रकाश छाजेड उद्यान ठरते आकर्षण ५ कोटींचे काम उद्यानाचे लोकार्पण, १४ कोटींचे महाराष्ट्रातील पहिले एसी मेळा बस स्थानक,१० कोटी निधी मंजूर होऊन सीबीएस बस स्थानक होणार आहे आधुनिक,स्वा.सावरकर जलतरण तलाव ३ कोटी निधी,आकाशवाणी केंद्राजवळ छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव पूर्णत्वास येत आहे.९ कोटींचा प्रकल्प, गांधीनगर येथील सर्व वाशी अटल बिहारी वाजपेयी स्मृती उद्यान प्रकल्प ३ कोटी रुपये निधींचे काम, अभिनव भारत मंदिराला ६ कोटींचा निधी मंजूर, मोठा राजवाडा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप ८५ लाख प्रकल्प पूर्ण, तसेच नागसेन नगर येथे व्यायाम शाळा बौद्ध विहार आणि समाज मंदिर दीड कोटींचा प्रकल्पाचे कामाची सुरुवात, शिवाजी वाडी येथे उभे राहणार आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सभागृह दीड कोटींचा प्रकल्प,आंबेडकर वाडीतील बौद्ध विहाराला ५० लाखांचा निधी मंजूर, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थीनी वसतिगृह, ग्रामदैवत कालिका माता मंदिर, रविवार कारंजा येथील चांदीचे गणपती मंदिर, मोरे मळा परिसरातील तुळजाभवानी मंदिर नामदेव शिंपी समाजाचे दीडशे वर्षे जुने विठ्ठल मंदिर, दाक्षिणात्य समाजाचे अय्यप्पा मंदिर, वनमाळी समाज दत्तोबा मठाचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, समर्थ रामदास स्वामी मठाची वास्तू,परमपूज्य जंगली महाराज मठाचे नूतनीकरण, रविवार कारंजा येथील गणपती मंदिर, नवसाला पावणाऱ्या कात्यायनी देवी मंदिराची पुनर्बांधणी, भद्रकाली मंदिर, वैदुवाडीतील सामाजिक सभागृह, शितलादेवी चे दगडी मंदिर, वनविभागासाठी सुसज्ज इमारत, दांडेकर दीक्षित तालमीचे नूतनीकरण,डिंगरआळी व्यायाम शाळेची पुनर्बांधणी, नाशिक महापालिकेची हद्दवाढ करण्यासाठी आग्रही, सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नर्सिंग कॉलेज, संदर्भ सेवा रुग्णालयात पीडीयाट्रीक न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी विभाग, यशवंत व्ययाम शाळा, कृषी नगर जॉगिंग ट्रॅक शिंपी गल्लीतील संत नामदेव महाराज सभागृहाचे नूतनीकरण, सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा सुशोभीकरण, यांसह अनेक कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत.
आपली नम्र
आ.प्रा.सौ देवयानी सुहास फरांदे
Comments
Post a Comment