नाशिक मराठा हायस्कूलमध्ये शिक्षकेतर दिन साजरा



मराठा हायस्कूल मध्ये शिक्षकेतर दिन साजरा करतांना उपस्थित सर्व मान्यवर

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये शिक्षकेतर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात होते.व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले,पर्यवेक्षक राजेंद्र शेळके,शंकर कोतवाल व रामनाथ रायते उपस्थित होते.
      १५ नोव्हेंबर १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ स्थापन करण्यात आले.शाळेच्या प्रशासकीय कामातील महत्त्वाचा घटक असलेले शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याप्रसंगी इयत्ता दहावी ची विद्यार्थिनी श्रुती पाटील हिने मनोगत व्यक्त केले.

मराठा हायस्कूल परिवारातर्फे सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मराठा हायस्कूलमधील मुख्य लिपिक विजय शिंदे, वरिष्ठ लिपिक संतोष मेढेपाटील, कनिष्ठ लिपिक नाना गवारे,शांताराम वडघुले,अश्विनी गोडसे,आकाश भिलोरे,विद्या पाटील तसेच प्रयोगशाळा सहाय्यक जिभाऊ खैर, ग्रंथपाल गंगाधर कोरडे त्याचबरोबर शिपाई मामा मोतीराम गांगुर्डे,सुनील मुळक,भावड्या भवर,संदीप महाले,निवृत्ती ढिकले,राजेंद्र पवार,अमीर शेख,तुषार कातडे,चेतन वाघ,अनिकेत पगारे,संतोष शिंदे, गुणाजी गायकवाड या सर्वांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी अभ्यासू ग्रंथपाल तसेच उत्तम वक्ते गंगाधर कोरडे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच कनिष्ठ लिपिक नाना गवारे यांनी देखील अतिशय अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना देखील आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केले.
 उपमुख्याध्यापक उगले म्हणाले, शालेय कामकाजात ऑफिसमधील क्लार्क हा खरंतर शाळा,संस्था, शासन यामधील खरा दुवा होय. शासनाची येणारी विविध परिपत्रके त्यानुसार सर्व माहिती संकलित करून योग्य वेळेत सादर करणे. विविध प्रकारची फी संबंधीची कामे, विद्यार्थी प्रवेशाची कामे,शिक्षकांची कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके असे कितीतरी प्रकारची कामे ते करत असतात त्याचबरोबर वर्ग स्वच्छता,शाळा,परिसर स्वच्छता दैनिक हजेरी ही सर्व कामे शिपाई मामा करीत असतात आणि अशा सर्वांना सन्मानपूर्वक सन्मानित करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. असे म्हणत त्यांनी सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षकेतर दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले तर पर्यवेक्षक शंकर कोतवाल यांनी आभार मानले.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला