देवयानी फरांदे,सीमाताई हीरे यांच्या विजयानंतर मा. नगरसेवक पदाधिकारी यांचा जल्लोष
इंदिरानगर - मध्य व पश्चिम विधान सभा मतदार संघात आमदार देवयानी फरांदे,तसेच पश्चिम मतदारसंघातून सीमाताई हिरे, भरघोस मताने विजयी झाल्याबद्दल नासर्डी ते पाथर्डी परिसरातील भाजपाच्या बालेकिल्लातील माजी नगरसेवकांनी चौका चौकात पेढे वाटून फटाके वाजवून परिसरात मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला.यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे,सतीश सोनवणे, सुनील खोडे, माजी नगरसेविका सुप्रिया खोडे,यशवंत निकुळे, रूपाली निकुळे,डॉ.दिपाली कुलकर्णी,अजिंक्य साने,शाम बडोदे पुष्पा आव्हाड,भगवान दोंदे, सुदाम ढेमसे,अमोल जाधव आदींसह कार्यकर्ते नागरिकांनी जल्लोष साजरा केला.
Comments
Post a Comment