छावा क्रांतिवीर सेनेचा मंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा
येवला,दि.१८ नोव्हेंबर : - येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांना विविध पक्ष आणि संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष नवनाथ वैराळ यांनी आज आमदार पंकज भुजबळ यांची भेट घेऊन मंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा जाहीर केला. येवला लासलगाव मतदारसंघाच्या विकासासाठी संघटना पाठिंबा देत असल्याचे पाठिंबा पत्रात म्हटले आहे.
यावेळी छावा क्रांतीवीर सेना लासलगाव शहराध्यक्ष रोहिदास पवार, गोविंद शिंदे, संतोष गोसावी, योगीराज जाधव, सुनील काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment