सरोज अहिरे यांनी मतदारसंघात केला झंझावाती दौरा महिला भगिनींनी औक्षण करत केले स्वागत
देवळाली :- देवळाली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौऱ्यानिमित्त मुंगसारे सह परिसरात मतदारांच्या नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या तसेच संवाद साधला. जल्लोषाने भरलेल्या या प्रचार कार्यक्रमात स्थानिक नागरिक, महिला, आणि तरुणांनी जोशपूर्ण सहभाग घेतला. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य स्वागत केले.
यात्रेदरम्यान महिलांनी औक्षण करून विजयासाठी आशीर्वाद दिले. तरुणाईचा जोम, महिलांचा सहभाग आणि ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन मिळाल्याने या पदयात्रेला विशेष ऊर्जा मिळाली. ग्रामस्थांच्या उत्साही प्रतिसादामुळे मातोरी येथील पदयात्रेने मतदारसंघात विजयाचे वातावरण निर्माण केले आहे. या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, मुंगसारे ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment