चिंचोळे घरकुल, दत्तनगर शिवार अंबड, गरवारे गौतमनगर प्रचार रॅली नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद
मायबाप जनतेचा आशीर्वाद, विजयाचा शंखनाद
देवळाली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरोज अहिरे यांनी गावभेट दौऱ्यानिमित्त चिंचोळे घरकुल, दत्तनगर शिवार अंबड, गरवारे गौतमनगर येथे नागरिकांच्या गाठी भेटी घेत संवाद साधला. जल्लोषाने भरलेल्या या प्रचार कार्यक्रमात स्थानिक नागरिक, महिला, आणि तरुणांनी जोशपूर्ण सहभाग घेतला. ठिकठिकाणी स्वागताचे मनोहारी दृश्य दिसत होते. नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले.
याप्रसंगी महिलांनी औक्षण करून विजयासाठी आशीर्वाद दिले. तरुणाईचा जोश, महिलांचा सहभाग आणि ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद मिळाल्याने या पदयात्रेला विशेष ऊर्जा मिळाली. ग्रामस्थांच्या उत्साही प्रतिसादामुळे चिंचोळे घरकुल, दत्तनगर शिवार अंबड, गरवारे गौतमनगर येथील पदयात्रेने मतदारसंघात विजयाचे वातावरण निर्माण केले आहे. या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी, युवा सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment