मखमलाबाद विद्यालयात महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी


फोटो - मखमलाबाद विद्यालयात महाराष्ट्राचे शिल्पकार,माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतीथीनिमित्त प्राचार्य संजय डेर्ले, उपप्राचार्य राजेंद्र गाडे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.
मखमलाबाद - मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे महाराष्ट्राचे शिल्पकार,माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.कु.समिक्षा दिघे व कु.आदिती जगताप यांनी यशवंरावांच्या जीवनकार्यावर प्रकाश झोत टाकला.यशवंतराव चव्हाण यांनी खर्‍या अर्थाने महाराष्ट्र घडविला आहे.त्यांच्या कार्यकाळात सहकार क्षेत्राबरोबरच,राजकिय,शेक्षणिक,सामाजिक क्षेत्रात फार मोठी प्रगती झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.जिया गुंजाळ हिने केले तर कु.भूमी पुरी हिने आभार मानले.त्यांना इ.८ वी ब च्या वर्गशिक्षिका योगिता कासार यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ शिक्षक प्रताप काळे,सोमेश्वर मुळाणे,प्रमोद पगार,अनिल पगार,अभिजीत न्याहारकर,योगिता कासार,योगिता कापडणीस,कल्पना देशमाने,चैताली मोगल,पल्लवी पगार सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी