Posts

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात - मंत्री संजय राठोड

Image
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात – मंत्री संजय राठोड  मुबंई,दि. २२: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील 670 पदांसाठीच्या फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा अधिक पारदर्शक, कोणत्याही तांत्रिक त्रुटींशिवाय पार पडावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील 670 पदांसाठीची फेरपरीक्षा आढावा बैठक मंत्रालय मध्ये आयोजित केली होती त्यावेळी मंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, टि.सी.एस. कंपनीचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदे सरळसेवेने भरण्यासाठी दि.19 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षा ही शासन मान्य टि. सी. एस. या कंपनीमार्फत, राज्‍यातील 28 जिल्हयातील निश्चित केलेल्या एकूण 66 केंद्रांवर दि.20 व दि.21 फेब्रुवारी 2024 या क...

नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोशिएशन पदी नितीन डोंगरे

Image
इंदिरानगर :- नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्सअसोशिएशनच्या कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन डोंगरे यांची निवड करण्यात आली. असोशिएशनचे संस्थापक, अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या बैठकीत अन्य कार्यकारिणी मंडळात मुख्य कार्यवाहक अनिल चव्हाण,उपाध्यक्ष सतीश कजवाडकर,खजिनदार सुनील देशमुख,सचिव संजय निकम,सहसचिव आनंद लहामगे,संयोजक हेमंत डागा,जनसपंर्क प्रमुख योगेश कातकाडे,सदस्यपदी पंकज भामरे,धरमचंद पारख,नयन निऱ्हाळी,चेतन पाटील,अंबादास गाजूल आदीचा कार्यकारी समितीत समावेश करण्यात आला आहे.

निधन वार्ता

Image
निधन काशीनाथ शार्दूल इंदिरानगर - करंजवन येथील रहिवासी काशीनाथ दामोदर शार्दूल (वय 80) याचे हृदय विकाराने निधन झाले. त्याच्या मागे तीन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे. ते इंदिरानगर येथील सामाजिक कार्यकर्ते सयाजी पगारे याचे काका होत.

इंदिरानगर येथे योग शिबीराचा समारोप

Image
इंदिरानगर :- आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त डी.जी.योगाअँड मेडिटेशन इंदिरानगर सेंटरतर्फे आयोजित मोफत तीन दिवसीय नृत्य योग शिबिराचा समारोप झाला.  स्टेट बँक कॉलनी सामाजिक सभागृह येथे माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने नृत्य योगाचे उद्घाटन झाले.योग योगाचर्या प्रशिक्षक दिलीप येलमामे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी शास्त्रीय नृत्य प्रशिक्षक सोनाली करंदीकर यांनी भरतनाट्यम गुरु याच्या विशेष सहभागाने योगाचे महत्त्व विशद करून नृत्य योगाचे तीन प्रकार सादर केले. या वेळी योग प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याचे प्रमुख पाहुणेच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आभार सागर येलमामे यांनी मानले.