Posts

फक्त १ दिवसांमध्ये सोने तारण कर्जामधुन मुक्ती मिळवा

Image
जाहिरात :- फक्त १ दिवसांमध्ये सोने तारण कर्जामधुन मुक्ती मिळवा  • कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही ?  • कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही ?  • कर्जाचे नुतनीकरण (Renewal ) करू शकत नाही ?  • बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणींमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. आजच संपर्क करा 7972967893   चिंता करु नका ! आम्ही आपणास सोनेतारण कर्जातून मुक्त करु ऑक्शन मध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ.

मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीला २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ

Image
(सौ.महासंवाद) मुंबई, दि. 27 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्‍दती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेल्या समितीस शाश्वत व आधारभूत कामकाज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दि.24 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाचे (साविस) सचिव सुमंत भांगे यांनी दिली. मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालिन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालिन संस्थानिकांना दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहीत...

दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यासाठी पूर्व तपासणी शिबिर संपन्न

Image
नाशिक :- केंद्र शासनाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत ALIMCO, मुंबई यांचे तर्फे दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यासाठी पूर्व तपासणी शिबिर,लक्षिका मंगल कार्यालय,सिटी सेंटर मॉल समोर,नाशिक येथे दिनांक 26/10/2023 रोजी घेण्यात आले. तपासणी शिबिरा वेळी नाशिक शहर व नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांची दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार नोंदणी करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी करून पात्र असणाऱ्या 400 पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने केंद्र शासनाच्या ALIMCO तर्फे लवकरच पुरवली जाणार आहेत. दिव्यांग बांधवांची नोंदणी, कागदपत्रांची तपासणी, मार्गदर्शनासाठी समाज कल्याण विभाग, नाशिक महानगरपालिका,पंचायत समिती नाशिक च्या कर्मचारी,अधिकाऱ्यांतर्फे व्यवस्था करण्यात आली होती.

नाशिक शहर पोलीसांची मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

Image
नाशिक : सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद यांचे ७५ वे वर्ष पूर्ती निमित्त पोलीस दलातील सदस्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फिट राईस ७५ प्रोग्राम अंतर्गत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ०५ किमी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये नाशिक शहर पोलीस येथून ३१४, नाशिक ग्रामीण ३२८ तर महाराष्ट्र पोलीस अकादमी येथून २६५ असे एकूण ९०७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ८५.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले १७१२ कोटी रुपये

Image
सर्वाधिक लाभार्थी शेतकरी अहमदनगर जिल्ह्यात जीवनातील अविस्मरणीय क्षण – कृषिमंत्री धनंजय मुंडे मुंबई दि. 26 : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी (जि. अहमदनगर) येथे करण्यात आला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील. प्रधानमंत्री  मोदी यांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. दरम्यान, हा आपल्या जीवनातील ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत नमूद केले आहे. उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याचे घोषणा केली होत...

अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Image
मुंबई , दि. २६ :  सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील रहिवाशी होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Image
कोविडसंदर्भातील अहवाल -‍ २० एप्रिल २०२१ मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३४ च्या ११ वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.४७ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत – जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) प्रणालीनुसार सादर करावयाचे आहेत. यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी 10.30 ते 11.30 तर अस्पर्धात्म...

शासन आपल्या दारी – बांधकाम कामगारांसाठी सुविधा

Image
ठाणे :- महाराष्ट्र शासन शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू मानून अनेक योजना राबवित असते. या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळून देण्यासाठी राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानाअंतर्गत आज आपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती. बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य विषयक सुविधा, आर्थिक सहाय्य, आदी विविध सुविधा देत आहे. या सुविधांमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुसह्य होण्यास मदत होत आहे. १) सामाजिक सुरक्षा- विवाहाच्या खर्चाची प्रतिपूर्ती रुपये ३० हजार मध्यान्ह भोजन – कामाच्या ठिकाणी दुपारी पौष्टिक आहार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप अवजारे खरेदी करिता ५ हजार रुपये मदत सुरक्षा संच पुरविणे अत्यावश्यक संच पुरविणे आवश्यक कागदपत्रे – सर्व योजनांकरिता आवश्यक अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड. बँक पासबुक झेरॉक्स बांधकाम कामगार नोंदण...

लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

Image
जागतिक दर्जाचे श्रद्धास्थान विकसित करणार मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही नागपूर दि. २४ : नागपूरच्या दीक्षाभूमीवर ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीने राज्य शासनाने २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देऊन तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या शुभ कार्याची आज मुहूर्तमेढ रोवली. नागपूर येथे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर ही घोषणा करण्यात आली. यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अधिकृत एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या 22.80 एकर परिसराचा विकास जागतिक दर्जाचा करण्यात येणार आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक्स कळ दाबत या विकास कार्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्य शा...

महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्य, न्यायाचा लौकिक पुन्हा एकदा जगभर पोहचणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक येथे ऐतिहासिक महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक, दिनांक 24 ऑक्टोबर, 2023  :-  नाशिकच्या पवित्र भूमीत बुध्द स्मारक परिसरात महाबोधिवृक्षाच्या रोपणातून आज आपण पुन्हा एकदा तथागतांच्या शांतीच्या शिकवणीची उजळणी करणार आहोत. हे रोपण पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील. आजच्या या ऐतिहासिक महाबोधिवृक्ष रोपणातून महाराष्ट्राचा सामाजिक ऐक्याचा, सामाजिक न्यायाचा लौकीक पुन्हा एकदा जगभर पोहचेल, असा विश्वास  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आज नाशिक येथील ऐतिहासिक आज  बुद्ध स्मारक, त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे आयोजित ऐतिहासिक महाबोधिवृक्ष भव्य महोत्सव 2023  कार्यक्रम प्रसंगी दूरदृष्यप्रणलीद्वारे शुभेच्छा संदेश देतांना ते बोलत होते. त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक येथे आज राज्य शासन व शांतदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीलंकेतील महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पूज्यनीय हेमरत्न नायक थेरो,  श्रीलंकेचे के...