Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

Image
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे शनिवारी (दि.१२) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि शासकीय जनसंपर्क क्षेत्रातील शांत, संयमी, संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे. संजय देशमुख हे गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या संयमित आणि प्रभावी कामकाजामुळे त्यांनी प्रशासन व प्रसारमाध्यमांमध्ये दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. पत्रकारितेतील कारकिर्दीची सुरुवात त्यांनी मुंबई दिनांक आणि दैनिक सकाळ या माध्यम समूहातून केली होती. माध्यमांतील अनुभवामुळेच त्यांच्या शासकीय जनसंपर्क कार्यात व्यावसायिकता आणि सुसूत्रता होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. सोमवार दि १४ रोजी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कर...

सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक सहाय्य योजना

Image
वंचित घटकांतील नागरिकांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात समान संधी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे. या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या पार्श्वभूमिवर या विभागाच्या शैक्षणिक योजनांची माहिती देणारा लेख… सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व विविध शिष्यवृत्तीच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. शासकीय वसतिगृह योजना :- या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मुलांचे व मुलींचे प्रत्येकी एक शासकीय वसतिगृह अशी एकूण (21) वसतिगृहे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये 11 मुलांची व 10 मुलींची शासकीय वसतिगृहे आहेत. या योजनेस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रक्कम रूपये (जिल्हा स्तर-600 व तालुका स्तर-500) इतका निर्वाह भत्ता मिळतो व विद्...

मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Image
‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दि.१२:- यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल,राजेश पाटील मुख्य अभियंता राजेश निघोट, अधी...

छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Image
मराठा सैन्य लँडस्केप्सला युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा नवी दिल्ली १२:- भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या ‘मराठा सैन्य लँडस्केप्स’ ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. या ऐतिहासिक यशामुळे मराठा साम्राज्याच्या रणनीतिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सर्व नागरिकांना या किल्ल्यांना भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींची भावनिक प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त करताना म्हटले, “मराठा साम्राज्याचा उल्लेख होताच सुशासन, सैन्यशक्ती, सांस्कृतिक गौरव आणि सामाजिक कल्याणाचा आदर्श डोळ्यासमोर येतो. या महान शासकांनी अन्यायाविरुद्ध न झुकण्याची प्रेरणा आपल्याला दिली आहे.” त्यांनी 2014 मध्ये रायगड किल्ल्याला दिलेल्या भेटीची आठवण सांगताना म्हटले, “रायगडावरील ती भेट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ...

डीजीजीआय बंगळुरू युनिटने 266 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या असलेल्या सहा बनावट कंपन्यांचा केला पर्दाफाश

Image
डीजीजीआय बंगळुरू युनिटने 266 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या असलेल्या सहा बनावट कंपन्यांचा केला पर्दाफाश , ज्यात 48 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट क्रेडीटचा समावेश,मुख्य सूत्रधाराला अटक नवी दिल्ली, 11 जुलै :- बंगळुरूमध्ये एका प्रकरणाच्या चौकशी संबंधित पाठपुरावा कारवाईत, जीएसटी गुप्तचर विभाग, बंगळुरू विभागीय युनिट महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत सहा हून अधिक ठिकाणी छापे टाकले आणि 266 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट पावत्या जप्त केल्या ज्यामध्ये बनावट कंपन्यांद्वारे 48 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळवणे आणि ते इतरांना देणे समाविष्ट होते.मुख्य सूत्रधाराने प्रत्यक्ष व्यवसाय नसलेल्या बनावट कंपन्या सुरू केल्या, उलाढाल वाढवण्यासाठी सर्क्युलर ट्रेडिंग केले, यातील एका कंपनीला शेअर बाजारात सूचीबद्ध केले आणि आयटीसी घोटाळा केला.तपासात आढळून आले की, कोणताही व्यवसाय नसलेल्या चार कंपन्यांनी शेकडो कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवांच्या पावत्या दाखवल्या आहेत. तपासात असे दिसून आले की सुरुवातीला, मुख्य सूत्रधार सीए/वैधानिक लेखापरीक्षकांपैकी एक होता, जो या कंपन्य...

शहापूरच्या शाळेची मान्यता रद्द झाली तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये - महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर

Image
शहापूर, दिनांक १० जुलै : शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकारानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभाग करेल मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही सुरू करावी. तसेच पोलिसांनी पालकांना विश्वासात घेऊन सखोल तपास करावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.शहापूरच्या शाळेत स्वच्छतागृहात मासिक पाळीचे रक्त आढळल्याने मुख्याध्यापिकांनी महिला सफाईगारामार्फत सर्व मुलींची आक्षेपार्ह शारीरिक तपासणी केली. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी आज शहापूर मध्ये पालकांची भेट घेतली. त्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पोलीस ठाण्यात जाऊन आतापर्यंतच्या तपासाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.पालकांचे म्हणणे तसेच शिक्षण विभाग, पोलिस तपासाचा आढावा घेतल्यानंतर श्रीमती चाकणकर म्हणाल्या, शिक्षणाधिकारी यांनी शाळेची तपासणी केल्यानंतर शाळेत तक्रार निवारण समिती नसणे, सखी सावित्री समिती केवळ रजिस्टर नोंद असणे अशा अनेक...

सुजाता करजगीकर यांची "भाजपच्या राज्य परिषदेवर निवड

Image
नाशिक :- राज्य परिषद ही भाजपच्या संघटनात्मक रचनेतील एक महत्वाची समिती आहे.ही पार्टीच्या धोरणात्मक निर्णयांवर चर्चा करणारी आणि संघटनात्मक दृष्टीकोनातून मार्गदर्शन करणारी राज्य पातळीवरील संघटना आहे.राजकीय धोरण ठरविणे,नवीन कार्यपध्दती ठरविणे,निवडणूक व्यवस्थापन,जनसंपर्क,प्रचार तंञ,याबाबत दिशा देणे.कार्यकर्त्याना प्रशिक्षित करण्यासाठी शिबीरे,कार्यशाळा आयोजित करणे.इ.विषयावर चर्चा करणे.यावर निर्णय घेणे.राजकीय घडामोडीवर चर्चा करण्यासाठी बैठका घेणे व ठराव पारित करणे. सक्रिय सहभाग निष्ठा,जनसंपर्क,नेतृत्व गुण,आणि संघटनात्मक कौशल्य या आधारावर ही नियुक्ती केली जाते.राज्य परिषदेवर मुख्यमंञी,प्रमुख नेते,आमदार,मंञी,खासदार त्याबरोबरबर त्या त्या जिल्हातील शिफारस केलेले पदाधिकारी या समितीत असतात.नाशिक महानगरातून सुजाता करजगीकर, यांची निवड करण्यात आली.त्या १९८९ सालापासून संघटनेत कार्यरत असून एकनिष्ठ यांची दखल घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,संघटनमंञी रवि अनासपुरे, नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार, लक्ष्मण सावजी,आ.देवयानी फंरादे,स...

कमी बोलून जास्त काम करणारी माणसे जीवनात यशस्वी - ॲड. नितीन ठाकरे

Image
नाशिक : भेंडाळी येथे सायखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत खालकर यांच्या आयोजित कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी बोलताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सायखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत खालकर यांचा कृतज्ञता सोहळा नाशिक :- आयुष्यात कमी बोलणे आणि जास्त काम करणे, असा स्थायीभाव असणारी माणसे जीवनात यशस्वी यशस्वी होत असतात. अशा माणसांच्या कर्तृत्वाने समाज घडत असतो, असे गौरवोद्गगार मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी काढले. सायखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत खालकर यांच्या भेंडाळी येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे माजी अध्यक्ष अरविंद कारे होते.सायखेडा येथे महाविद्यालयात प्राचार्य म्हणून भेंडाळीचे भूमिपुत्र श्रीकांत खालकर हे दोन महिन्यांपूर्वी रुजू झाले. त्यांनी समाजाप्रती, गावाप्रती, आपल्या संस्थेप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देत सेवेतील अनुभवाची अनुभूती करत सर्वांप्रत...

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

Image
सोलापूर जिल्ह्यातील कटुळे तन्मय तानाजी राज्यातून प्रथम; एकूण ६५१९ उमेदवार विषयांकित पदाकरिता शिफारसपात्र मुंबई, दि. ११ :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण २७८ नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ६५१९ उमेदवार विषयांकित पदाकरिता शिफारसपात्र ठरले आहेत.सोलापूर जिल्ह्यातील  कटुळे तन्मय तानाजी (बैठक क्रमांक AU053165) हे राज्यातून प्रथम आले आहेत. मागासवर्गवारीमधून पुणे जिल्ह्यातील  किसवे किशोर चंद्रकांत (बैठक क्रमांक- PN068345) हे राज्यात प्रथम आले आहेत तर महिला वर्गवारीमधून सांगली जिल्ह्यातील गावडे दुर्गा विजयराव (बैठक क्रमांक -PN071182) या राज्यात प्रथम आल्या आहेत. अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ...

तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा युनेस्कच्या जागतिक वारसा यादीत समावेश

Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्याचा आनंद आणि अभिमान, महाराष्ट्रवासियांचे अभिनंदन, हा वारसा जपूया – उपमुख्यमंत्री अजित पवार युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्याचा आनंद व अभिमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कृतीशील सहकार्याबद्दल विशेष आभार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेचे अभिनंदन जागतिक वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांसह सर्वच किल्यांच्या संरक्षण, संवर्धनासह त्यांचे महत्व नव्या पिढीपर्यंत घेऊन जाऊया – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा मुंबई, दि. 11 :- महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खा...

प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत – राज्य निवडणूक आयुक्त

Image
मुंबई, दि. 11 :- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज करावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.वाघमारे म्हणाले की, राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल. मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळ इत्यादींची आपल्या स्तरावरील उपलब्धता लक्षात घ्यावी. मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आवश्यक संख्येचा अंदाज घेता येईल. मनुष्यबळाबाबत विभागीय आयुक्तांनी समन्वयकाची भूमिका घेऊन सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत वेळोवेळी आढावा घ्यावा...

ना.रोड रेल्वे पोलीसांनी चार लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत दोघांना अटक

Image
रेल्वे पोलीसांनी चार लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला दोघांना अटक विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे ना.रोड :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिक रोड रेल्वे पोलिसांची प्रभावी कामगिरी. फिर्यादी नामे दीपक चंद्रकांत सोनवणे राहणार रामानंद नगर तालुका जिल्हा जळगाव हे गीतांजली एक्सप्रेसचे गीतांजलि एक्सप्रेस मधून कल्याण ते जळगाव असा प्रवास करत असताना नाशिक रोड रेल्वे स्टेशन येण्याच्या दहा मिनिटे अगोदर त्यांना समजले की त्यांचे एक सॅकबॅक त्यात एक आयफोन आय पॅड व रोख रक्कम असे चोरट्याने चोरून नेले बाबत नाशिक रोड येथे तक्रार दाखल होती. त्यावरून चोरीस गेलेल्या आयफोनचे आयफोन हा ट्रेसिंग प्राप्त झाल्याने सदर आयफोन विकत घेणारा कृष्णा धोंडू लोहकरे याला ताब्यात घेतले असता त्याने सदरचा मोबाईल हा चोरीचा असल्याचे माहित असून देखील विकत घेतले चे कबूल केल्याने व त्याने सदरचा मोबाईल हा रुपेश अजय जाधव राहणार दोघे कसारा तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले त्यावरून दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याती...