Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

Image
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे केले उद्घाटन बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे केले लोकार्पण सोलापूर विमानतळाचे केले उद्घाटन भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी “महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांमुळे शहरी विकासाला चालना मिळेल आणि लोकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल” "पुणे शहरातील नागरिकांचे जीवनमान अधिक सुखकर करण्याच्या स्वप्नाच्या दिशेने आम्ही वेगाने वाटचाल करत आहोत" "सोलापूरला थेट हवाई मार्गाने जोडण्यासाठी विमानतळाच्या अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण " "भारत आधुनिक झाला पाहिजे, परंतु भारताचे आधुनिकीकरण आपल्या मूलभूत मूल्यांवर आधारित असले पाहिजे" " मुलींसाठी बंद असलेली शिक्षणाची कवाडे सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या थोर व्यक्तींनी उघडली" दोन दिवसांपूर्वी खराब हवामानामुळे पुण्यातील त्यांचा कार्यक्रम रद्द झाल्याची आठवण पंतप्रधानांनी आपल्या करून दिली आणि आजच्या आभासी कार्यक्रमाचे श्रेय तंत्रज्ञानाला दिले. थोर व्यक्तींची...

विकासात्मक कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा प्रयत्न - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप नागपूर, दि. 29 – राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे. एकीकडे आपण विकासाची गती कायम राखली असून दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. विकास कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. खामला येथील शांतीनिकेतन कॉलनी मैदान आणि हावरापेठ येथे बांधकाम कामगार मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप यावेळी करण्यात आले. बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव, स्थानिक आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होत आह...