Posts

Showing posts from August, 2025

इंदिरानगर येथे ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ मोहिमेंतर्गत तपासणी शिबिर सुनील केदार यांच्या हस्ते उद्घाटन

Image
इंदिरानगर :- गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या संकल्पनेतून‘श्रीगणेशा आरोग्याचा’ही विशेष मोहीम राबवलीजात आहे. इंदिरानगर येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मित्रमंडळ युवा मंच श्री रथचक्र सोसायटी वीर सावरकर चौक,संस्थापक तथा माजी सभागृह नेता चंद्रकांत खोडे यांच्या सहकार्याने व एचसीजी मानवता कॅन्सरच् सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार,सरचिटणीस सुनिल देसाई,मंडल अध्यक्ष उदय जोशी,डॅा.वैभव महाले,यांचा हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.या शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांनी ४५० पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करून मोफत सल्ला दिला.तसेच माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे,यांनी विविध शासकीय आरोग्य योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्याची माहिती दिली. शिबिर यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सुनिल राऊत,संकेत खोडे,अवधुत कुलकर्णी, सुनिल खोडे,अरुण मुनशेट्टीवार,सुरेश खोडे,कमलाकर खोडे,गणपत खोडे,राजेंद्र खरात,रोहीत ...

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीवर आधारित श्री गणेश आरास

Image
नाशिक इंदिरानगर :- येथील अभ्यंकर कुटुंबियांनी साकारलेली घरगुती गणेश सजावट तिच्या विषय वस्तूमुळे आणि सादरी करणामुळे विशेष दाद मिळवत आहे. ही सजावट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना अर्पण करण्यात आली असून त्यांचे जन्मस्थळ भगूर येथील घराची हुबेहूब प्रतिकृती म्हणून मांडण्यात आली आहे. ही सजावट धनंजय अभ्यंकर,मंजिरी अभ्यंकर आणि त्यांचा मुलगा यांनी तब्बल दीड महिन्याच्या कालावधीत सातत्याने मेहनत घेऊन साकारली आहे.या सजावटीची खासियत म्हणजे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.शाडू मातीचीमूर्ती आणि सजावटीसाठी वापरलेले साधे पण कल्पक साहित्य ६ बाय ४ आकाराचे २१ पुढे, चार्ट पेपर्स/बाउंड पेपर्स २०, अॅक्रेलिक रंग व ग्लूगनयांच्या सहाय्याने ही आकर्षक सजावट उभारली आहे. अभ्यंकर कुटुंबियांच्या मते, ही सजावट ही केवळ गणरायाला अर्पण नसून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अदम्य राष्ट्रभक्ती,त्याग आणि विचारांचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न आहे.

इंदिरानगरात साकारला हुबेहुब कामाख्या मंदिराचा देखावा भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Image
नाशिक इंदिरानगर :- भाजपा प्रणित इंदिरानगर उत्सव समितीला यंदा11 वर्ष पूर्ण होत असून मंडळाच्या या वर्षानिमित्त पृथ्वीवरील ५१ शक्तीपीठां पैकी पवित्र आणि सर्वात जुने मानले जाणाऱ्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथील माँ कामाख्या देवीच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. गणेशोत्सवात हा देखावा भाविकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. इंदिरानगरातील भाजप प्रणित उत्सव समितीची स्थापना 2014 साली झाली आहे. इंदिरानगर येथील बापू बंगल्यासमोरील माजी नगरसेविका सुप्रिया खोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात श्री कामाख्या देवीच्या मंदिराचा प्रतिकृतीचा देखावा साकारण्यात आला आला आहे.मंडळाचे संस्थापक,अध्यक्ष माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. खोडे म्हणाले की,समितीत एकुण 100 पेक्षा जास्त महिला व ज्येष्ठ नागरिकांसह सभासद संख्या असून सर्व समाजातील लोक सदस्य आहेत.यंदा गिरीश पाठक हे अध्यक्ष आहेत तर स्वागत कार्याध्यक्ष म्हणून प्रविण नागरे,तसेच देखाव्याचे कामकाज माजी नगरसेविका सुप्रिया खोडे, निखिल खोडे यांनी पाहिले.देखरेख उपाध्यक्ष उमेश जाधव,दीपक लोंढे सह जेष्ठ सभासद यांनी केली.गेल...

शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळाचे ५९ वे गणेशोत्सव वर्षांचे सामाजिक कार्य

Image
नाशिक :- हिंदु एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ,पाच रस्ता,नाशिक हे गेली ५९ वर्षे नाशिक शहरात सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेम जोपासणारे एक अग्रगण्य मंडळ म्हणून कार्यरत आहे. सन १९६६ मध्ये स्व. तुळशीराम बावरी आणि स्व. जगु वस्ताद गायकवाड यांनी या मंडळाची स्थापना केली.त्याकाळी उपेक्षित असलेल्या पाच रस्ता परिसरात प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात या मंडळाने केली. उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने टेम्बलाई माता मंदिर आणि हनुमान मंदिर उभारले. मंडळाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे प्रत्येक वर्षी ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक देखावे सादर करणे.प्रबोधनात्मक देखाव्यांचा ठसा आणीबाणी, महागाई, अंधश्रद्धा, दहशतवाद, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या,मतदार जनजागृती, पर्यावरण संवर्धन, पाणी बचत असे अनेक विषय मंडळाने देखाव्यांमधून मांडले आहेत. नाशिकमध्ये सर्वप्रथम हत्तीवरून गणेश मिरवणूक काढण्याचा उपक्रम याच मंडळाने राबवला. १९७८ मध्ये मर्दानी खेळाचे सादरीकरण करून प्रथम पारितोषिक पटकावले. १९८० मध्ये हिंदू एकता आंदोलनाची स्थापना झाल्यानंतर मंडळाचे नाव ...

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी

Image
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार मुंबई, दि.२८:-  गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर यांचा संयुक्त सहभाग राहणार आहे. याशिवाय मोठ्या संख्येने गणेश मंडळे या उपक्रमात सक्रिय सहभागी झाली आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार असून, तपासणी दरम्यान आ...

धांद्रीचा राजा तसेच सोयगाव मालेगाव परिसरात गणरायाचे जल्लोषात आगमन प्रतिष्ठापना

Image
बागलाण :- धांद्रीच्या राजाच वाजत गाजत आगमन, तसेच सोयगाव मालेगाव परीसरातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनेही गणपती बाप्पा चे ढोलताशाच्या डिजेच्या तालावर वाजत गाजत नाचत ग्रामस्थांच्या वतीने स्वागत गणरायाची स्थापना करण्यात आली.यावेळी  सह्याद्री मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्यासह परीसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. धांद्रीच्या राज्याचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी आबालवृद्ध महिलांसह मोठ्या प्रमाणात धांद्री गावातील नागरीक यावेळी उपस्थित होते.

गणेशोत्सव राज्य महोत्सव

Image
यंदा राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ दर्जा दिल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळख अधिक गडद होणार आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. या विषयीच्या विविध निर्णयांची माहिती देणारा हा लेख.महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, जिथे तो एक सार्वजनिक उत्सव बनला आहे. १९ व्या शतकात, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला एक सार्वजनिक सण म्हणून सुरू केले, ज्यामुळे तो अधिक लोकप्रिय झाला. विशेषतः मुंबई – पुण्याचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. जगात आणि देशात आपल्या गणेशोत्सवाची ओळख सर्वात मोठा महोत्सव म्हणून झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. महाराष्ट्र शासनाने यंदा गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्याने विशेष आ...

ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक रोड सेवा केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

Image
(प्रतिनिधी - समाधान शिरसाठ) नाशिकरोड :- ब्रह्माकुमारी संस्थेच्या पूर्व प्रशासिका दादी प्रकाशमणीजी यांच्यापुण्यस्मरणानिमित्त विश्वबंधुत्व दिवसाचे औचित्य साधून नाशिक रोड सेवा केंद्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे अध्यक्षस्थान नाशिक रोड सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी शक्ती दीदी यांनी भूषविले.कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षिका अरुणा मुगुटराव, सामाजिक कार्यकर्त्या राजनंदिनी अहिरे,सिव्हिल हॉस्पिटलचे ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर डॉ.राजेंद्र दुसाने,मलबार हिलचे बिल्डर राजू सांगळे,आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या मनोगतात कारागृह अधीक्षिका अरुणा मुगुटराव,यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले की,“संस्था फक्त रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमांतच नव्हे तर कैद्यांच्या सुधारणेसाठी व पुनर्वसनासाठीही उल्लेखनीय कार्य करते. नियमित मूल्याधारित प्रवचनांमुळे कैद्यांमध्ये सकारात्मक परिवर्तन होत असून ते एक चांगले नागरिक घडविण्याचे कामआहे.”अध्यक्षीय भाषणात शक्ती ...

नाशिक येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन

Image
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक  :- येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या वतीने संस्थेच्या पूर्व प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान जगभरात विविध सेवा केंद्रांमधून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान एक लाख युनिट रक्त संकलनाचा निर्धार संस्थेच्या सदस्यांनी केला आहे. आज, २३ ऑगस्ट रोजी येथील म्हसरूळ सेवा केंद्रातर्फे संस्थेच्या उपक्षेत्रीय मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे, रेडिओलॉजिस्ट डॉ.राजेश जावळे,सामाजिक कार्यकर्ते आणि स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते,आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले की, "रक्तदानामुळे फक्त एकच जीव वाचत नाही, तर त्यातील कंपोनंट वेगवेगळे करून जवळपास चार व्यक्तींना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात आणि त्यांना मोठ्या प्र...

मविप्र जनता विद्यालय पवननगर मध्ये सखीसावित्री, अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने समुपदेशन व मार्गदर्शन संपन्न

Image
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय पवननगर येथे सखी सावित्री व अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनी तसेच माता पालकांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध समुपदेशिका डॉ. शितल गायकवाड या होत्या. तसेच माजी नगरसेविका प्रतिभाताई पवार, डॉ. सुलक्षणा बैरागी, शुभांगी गलांडे, कविता अहिरे, नाशिक सिव्हिल हॉस्पिटल आयसीटी विभाग प्रमुख योगिता चौधरी, ॲड. विद्या चव्हाण, नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी उदय देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक अण्णासाहेब ठाकरे यांनी प्रास्ताविकात सखी सावित्री व अंतर्गत तक्रार समितीच्या समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्या प्रतिभाताई पवार यांनी आपल्या मनोगतात सर्व माता पालकांना आपल्या विद्यार्थिनी पाल्यांच्या बाबतीत जागरूक राहण्यास सांगितले. डॉ. सुलक्षणा बैरागी यांनी विद्यार्थिनी व माता यांना आरोग्य व योगशिक्षण याविषयी माहिती दिली. आयसीटी सिविल हॉस्पिटल महाराष्ट्र राज्य एच.आय. व्ही. व एड्स नियंत्...

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास २६ तारखेपर्यंत मुदतवाढ

Image
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा मुंबई, दि. २४:- राज्य शासनाच्यावतीने या वर्षीपासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ च्या अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांना सहभागी होता यावे, यासाठी आता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०२५ असेल.या स्पर्धेचे अर्जhttps://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून ऑनलाईन पोर्टलद्वारे ते स्वीकारले जाणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभागी होऊन तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पारितोषिके जिंकावीत, असे आवाहन मंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

Image
नाशिक :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. करारानुसार दोन्ही संस्था संयुक्तरित्या नवी मुंबई येथील जेएनपीए परिसरात ड्रायव्हिंग आणि लॉजिस्टिकचे देशातील सर्वात अत्याधुनिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार आहेत. विद्यापीठात उभय पक्षातर्फे करारावर स्वाक्षरी केली.विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे,बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या लर्निंग अँड डेव्हलपमेंटचे सहायक उपाध्यक्ष सुरज महाजन, विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड,व्यवसाय शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखेचे संचालक डॉ.जयदीप निकम,बीव्हीजीचे उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब कांकळे,वरिष्ठ व्यवस्थापक प्रशिक्षण सुदर्शन भालेराव,उपस्थित होते.या करारानुसार अत्याधुनिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकासकेंद्र निर्मितीचा उपक्रम ड्रायव्हिंग व लॉजिस्टिक क्षेत्रात जागतिक दर्जाची कौशल्ये,आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण आणि मोफत प्रशिक्षणाची त्रिसूत्री पूर्ण करेल.जेएनपीए मधील बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरमध्ये या प्रकल्पाचा पहिला प्रशिक्षण वर्ग राबवला जाईल.त्यानंतर जेएनपीएच्य...

कृषी विभागाच्या योजनांची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Image
कृषिमंत्र्यांकडून विभागाचा राज्यस्तरीय आढावा  पुणे, दि. २२ : शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने त्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती अधिकाधिक गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था येथे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, संचालक अशोक किरनळ्ळी, अंकुश माने तसेच उपसचिव, राज्यातील प्रकल्प संचालक, उपसंचालक, विभागीय सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सहसंचालक व कृषी आयुक्तालयातील कर्मचारी उपस्थित होते. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अधिकाऱ्यांनी योजनांमधील बारकावे लक्षात घेऊन योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळेल याची काळजी घ्यावी. क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन नेहमीच असेल. काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातील. परंतु कामात कुचराई करणाऱ...

जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
सामाजिक क्षेत्र वॉर रूममधील योजनांची आढावा बैठक मुंबई, दि. २२ :- जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना, उपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या सर्वांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. यंत्रणांनी योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नाही, याबाबत यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित बैठकीत सोशल सेक्टर (सामाजिक क्षेत्र) वॉररूम मधील योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी तपशीलवार आढावा घेताना मुख्यमंत्री  फडणवीस बोलत होते. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.अमृत २.० अभियानाचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरी भागात पाणीपुरवठा, मलनिःसारण, हरित उद्याने व सरोवर पुनरुज...

करचुकवेगिरी प्रकरणात दोन जणांना अटक ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक

Image
करचुकवेगिरी प्रकरणात दोन जणांना अटक ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३० कोटी ५२ लाख रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणात अटक केली. आरोपींनी चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) वजावट घेतल्यामुळे शासनाची महसूल हानी झाली. न्यायालयाने त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.कारवाईदरम्यान व्यापाऱ्याने चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट वजावट केल्यामुळे शासनाची महसूल हानी झाल्याचे आढळून आले. राज्यकर सहआयुक्त संजय पवार आणि उपायुक्त स्वप्नाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश पाटील, शरदचंद्र पोहनकर, भूपेन्द्र वळवी, मनोहर कनकदंडे यांनी ही कारवाई केली.संबंधित आरोपी करदात्याची कृती महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ व संबंधित नियमांचे सरळ उल्लंघन आहे. अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी, मुंबई यांनी आरोपींना ०४ सप्टेंबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग आधुनिक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून व इतर शासकीय विभागांशी समन्वय साधून कर...

अभोणा चौफुली पोलीस स्टेशन अभोणा रस्त्याची चाळण तात्काळ दुरुस्ती न केल्यास रास्तारोकोचा इशारा

Image
कळवण :- अभोणा चौफुली,पोलीस स्टेशन अभोणा रस्त्याची दैनीय अवस्था झाली आहे.याबाबत वेळोवेळी वाहनधारकांनी नागरिकांनी तक्रारी करुनही निद्रिस्त प्रशासनाला जाग येत नसल्याने वाहनधारक नागरिकांनी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्याने नागरिकांना शाळकरी विद्यार्थी यांना पायी चालणे मुश्किल झाले आहे.आदीवासी बांधकाम कळवण विभागाचे अधिकारी पाटील, बिरारी यांना तक्रार केलेली आहे.मात्र कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.सदरच्या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी व्हावी ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरीक करित आहे.सदर रस्ता तात्काळ खड्डे मुक्त व्हावा अशी  मागणी केली जात आहे.सदर रस्त्याबाबत विभागाचे इंजिनिअर पाटील, यांना श्री अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती कळवण तालुका कार्यकर्ता विजय चव्हाण यांनी निवेदन दिले आहे.

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या समाजदिन सोहळा संपन्न

Image
कर्मवीरांचा जीवनप्रवास प्रेरणादायी – विलास शिंदे नाशिक :- सर्व क्षेत्रामध्ये विकासाचा वेग वाढत असतांना या बदलाला नवी पिढी कशी जुळवून घेते आहे यावर सर्व भविष्य अवलंबून राहणार आहे. अशा परिस्थितीत शिक्षणाने मुलांना घडविणे मोठे आव्हान असणार आहे. अशा वेगाचा वेध घेऊन पुढील शिक्षणाची दिशा ठरविण्याची गरज आहे. विज्ञान तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल होत आहे. या पार्श्वभूमीवर जात,पात,पंथ या सीमा गळून पडत आहेत.बहुजनांची असलेली मविप्र संस्था हि कर्मवीर रावसाहेब थोरातांपासून कर्मवीर डॉ वसंतराव पवारांपर्यंत तळमळीने समाजहित जोपासण्याचे कार्य करीत असून कर्मवीरांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सह्याद्री फार्म चे संचालक विलास शिंदे,यांनी केले ते मराठा विद्या प्रसारक समाजाच्या समाजदिन कार्यक्रमात संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले,होते.व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे,उपाध्यक्ष विश्वास मोरे,उपसभापती देवराम मोगल,माजी अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, संचालक डॉ सयाजी गायकवाड,डॉ प्रसाद सोनवणे, अँड.स...

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवॉर्ड

Image
लोकमत वृतपत्र समुहाने केला सन्मान; लंडन येथे पार पडला दिमाखदार सोहळा मुंबई, दि. 19 : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्या विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लंडन येथे काल एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ ही जागतिक परिषद पार पडली. आपल्या कार्यातून देशाचे नाव जागतिक स्तरावर ज्यांनी उज्ज्वल केले आहे, अशा व्यक्तींना लोकमत वृतपत्र समूहाने ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरवले होते. पंकजा मुंडे, यांनी आपल्या कुशल व अभ्यासू मार्गदर्शनखाली पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन विभागात उल्लेखनीय काम करून एक नवा आयाम प्रस्थापित केल्याबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित होते.चर्चासत्रा...

संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाप्रमुख पदी प्रफुल्ल वाघ यांची नियुक्ती

Image
पुणे  :- पुणे येथे झालेल्या पदाधिकारी पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक जिल्हा प्रमुख पदी प्रफुल्ल वाघ, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वाघ हे गेल्या १३/१४ वर्षापासून मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, व पुरोगामी चळवळीचे काम सक्रिय राहून करत आहेत.अनेक आंदोलने, तसेच निवेदन देऊन सरकार दरबारी अडकलेले काम तडीस घेऊन गेलेले आहेत.कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख ही जबाबदारी त्यांनी पार पडली आहे.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड मनोज आखरे,महासचिव सौरभ खेडेकर,मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे,यांच्या हस्ते नाशिक जिल्हाप्रमुख म्हणून प्रफुल्ल वाघ,यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रफुल्ल वाघ,यांना यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्राथमिक सदस्य नाशिक शहराचे कार्याध्यक्ष शहराचे महानगर अध्यक्ष,अशी जबाबदारी देण्यात आली होती.आता जिल्हाप्रमुख या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांना मिळाली आहे. विचारधारेशी प्रामाणिक राहून मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,चा विचार कधीही न सोडता त्यावर सातत्याने काम केल्यामुळेच ही जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे.सर्व प्रमुख पदाधिकारी मित्रपरिवाराच्या वतीने वाघ यांना नवीन जबाबदारी बद्...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘ ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ स्वदेशी’ विषयी जनजागृती करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठक मुंबई, दि. १२ : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ‘ ऑपरेशन सिंदूर’ वर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, त्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथी गृह येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री आढावा घेताना बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित हो...

जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी - मंत्री दादा भुसे

Image
मुंबई, दि. १२:- विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त, संस्कारांच्या माध्यमातून उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट, गाईडची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. इच्छुक शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, उपसचिव तुषार महाजन, क्रीडा विभागाचे सहायक संचालक तथा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस्‌चे राज्य चिटणीस मिलिंद दिक्षित उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मंत्री भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या माता पित्यांचा, वडीलधाऱ्यांचा, गुरुजनांचा आदर करणे, शिस्त अंगिकारणे आदी बाबी शिकणे आवश्यक आहे. स्का...

बीज राखी'तून पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची प्रेरणा - ॲड.नितीन ठाकरे

Image
केटीएचएम महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या 'बीज राखी' उपक्रमाच्या उदघाटनानंतर राख्या न्याहाळताना ॲड.नितीन ठाकरे,समवेत मान्यवर केटीएचएम माहविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बनविल्या पर्यावरणपूरक राख्या नाशिक :-(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)केटीएचएम महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेला 'बीज राखी' उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, या उपक्रमामुळे समाजामध्ये पर्यावरणपूरक सण साजरे करण्याविषयी जनजागृती निर्माण होण्याची प्रेरणा मिळेल. पर्यावरण, जैवविविधता, दुर्मिळ व प्रादेशिक वनस्पतींच्या बीज संरक्षणाचा संदेशही समाजापर्यंत पोहोचेल,असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी केले. केटीएचएम महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात "बीज राखी" हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाचे उदघाटन सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले. उदघाटनप्रसंगी बोलतांना बीज राखी या संकलपनेचे व उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या उपक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमास मविप्रचे संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, डॉ. सयाजीराव गायकवाड, रमेश पिंगळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ...

अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

Image
वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडवर ! मंत्री, खासदार,आमदारांच्या सुचनांनुसार वाळू माफियांना सोडू नका वाळू तस्करीत सामील अधिकाऱ्यांवरही निगराणी ठेवा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई करावी वाळू साठे व घाटांचे पुन्हा सर्व्हे करा बुलढाणा, दि. ९ :- जिल्ह्यातील वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीए अर्थात महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना शनिवारी महसूल विभागाच्या आढावा बैठकीत दिले.महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी, भूमि अभिलेख विभागाचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे काल जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यानुषंगाने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात महसूल व इतर विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी मंत्री बावनकुळे यांनी निर्देश दिले. या बैठकीला कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॅा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘दिशा अभियान’ची यशस्वी अंमलबजावणी

Image
महाराष्ट्र अभियानात देशात अग्रस्थानी विशेष मुलांच्या शिक्षणात नवा आदर्श मुंबई,दि.१० : बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकसमान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा दाखवणारे ‘दिशा अभियान’ महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘दिशा अभियान’ने बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अभूतपूर्व बदल घडवून आणला आहे.महाराष्ट्रात या उपक्रमाची अत्यंत प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणीमुळे संपूर्ण देशासाठी आदर्श घालून दिला आहे.जय वकील फाउंडेशनने विकसित केलेला आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दि एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीज (NIEPID) मान्यताप्राप्त हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राज्यातील ४५३ विशेष शाळांमध्ये लागू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे दिव्यांगाच्या गरजांना प्राधान्य देणारे देशातील पहिले राज्य आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे ही महाराष्ट्र पहिले राज्य असून दिशा अभियानामुळे विशेष विद्या...

गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्तांचा नाशिक जिल्हापरिषदेत सन्मान

Image
नाशिक जिल्हा जिल्हापरिषद कर्मचारी पतसंस्थेचा नाशिकच्या जिप सभागृहात झाला दिमाखदार कार्यक्रम नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेचे चेअरमन नितीन पवार,यांच्या अध्यक्षतेखाली दि,१०ऑगष्ट २०२५ रोजी जिप च्या केशवंराव थोरात सभागृहात झाली.तत्पुर्वी जिल्हा परिषदेच्या विविध विभागात सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा विध्यार्थिनींचा सन्मान यावेळी करण्यात आला.कृषी,पशु संवर्धन विभागाचे उपसचिव इंजिनिअर अंबादास चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच दुर्गसंवर्धन अभ्यासक व्याख्याते प्रा राम खुर्दळ यांच्या हातून सेवा निवृतांचा व गुणवंतांचा शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला.यावेळी नाशिकच्या शिवकार्य गडकोट संस्थेचे राम खुर्दळ,यांनी विद्यार्थी व सेवानिवृत्त यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मनुष्याचे आयुष्य आहे तों पर्यंत त्याला सेवा करता येते, त्यामुळं सेवा कार्यासाठी कुठलं वय लागत नाही, सेवा निवृत्ती नंतर आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी व्यायाम करा, सह्याद्रीत यायचे तर आमच्या सोबत दुर्ग संवर्धन कार्याला जोडा, नसेल जमत तर शिवकार्...

मनुष्याचे जीवन उज्वल बनवण्यासाठी द्वादश ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळ्याचे आयोजन - ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी

Image
लाखो भक्त करतील  एका भव्य मंडपात एकाच ठिकाणी जगप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतिरूप दर्शन त्र्यंबकेश्वर दिनांक १० :- भक्तांच्या भक्तीला आधार देण्यासाठी, मनुष्याचे जीवन उज्ज्वल बनवण्यासाठी, संपूर्ण भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगांचे एकत्रितरीत्या, एका छताखाली दर्शन घेण्याचे भाग्य लाभावे, यादृष्टीने हा द्वादश ज्योतिर्लिंग प्रतिरूप अध्यात्मिक मेळा आयोजित करण्यात आलेला आहे.आजच्या कार्यक्रमाला आपल्यासारखे वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले पाहुणे लाभले, आपल्या विचारांतून नक्कीच भगवंताचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल व आपल्या द्वारेही समाज उत्थानाचे हे श्रेष्ठ कार्य घडेल, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रीय मुख्य संचालिका, राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले.श्रावण महिन्यात भगवंताच्या दर्शनाचे महत्त्व सांगितले जाते, त्यातही श्रावणी सोमवारी यात विशेष पुण्य प्राप्त होते; म्हणून मोठ्या प्रमाणात भक्तगण त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये येतात. याचेच औचित्य साधून ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक उपक्षेत्रीय सेवा केंद्रातर्फे, प्रसिद्ध अशा त्र्...

भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

Image
मुंबई, दि.९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे. सध्या देशात ६ राष्ट्रीय पक्ष, ६७ प्रादेशिक पक्ष आणि २८५४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष (RUPPs) आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणी करताना पक्षांनी नाव, पत्ता, पदाधिकारी यांची माहिती द्यावी लागते तसेच सहा वर्षे सलग निवडणूक न लढवल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे.जून २०२५ मध्ये आयोगाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ३४५ RUPPs ची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. तपासणीदरम्यान संबंधित पक्षांना नोटिसा देऊन प्रत्यक्ष सुनावणीची संधी देण्यात आली. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, ३३४ पक्षांनी आवश्यक अटींचे पालन केले नाही. उर्वरित प्रकरणे पुनर्पडताळणीसाठी परत पाठवण्यात आली आहेत. परिणामी, आता देशातील RUPPsची संख्या २८५४ वरून २५२० वर आली आहे. या पक्षांना आता लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम २९ब आणि २९क तसेच आयकर...

राज्य परिवहन महामंडळाच्या इगतपुरी आगारात जागतिक आदिवासी दिन साजरा

Image
इगतपुरी :- आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्य परिवहन विभागाच्या इगतपुरी आगार येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी आगार व्यवस्थापक अहिरे साहेब,यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण करण्यात आले.अधिकारी सानप साहेब, ढकाणे साहेब, कोरडे साहेब, तळपाडे साहेब,नाठे साहेब,यांच्या उपस्थित जागतिक आदिवासी दिनानिमित्त विवीध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी आदिवासी नेते संजय गातवे,यांच्या उपस्थितीत असंख्य आदिवासी बांधव तसेच सहकारी कर्मचारी तसेच ज्येष्ठ कर्मचारी वृंद तसेच इगतपुरी आगारातील नामदेव जाधव,शिवाजीराव डगळे, संतोष धोंगडे,मदन धोंगडे,बाळू गभाले,रामदास येडे, कैलास भोईर,योगेश काळे, पंकज दाणी,ज्ञानेश्वर भांगरे, भगवान बुले,गोविंद गोहिरे, दशरथ जोशी, आदींसह इगतपुरी आगार कर्मचारी वृंद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

Image
इंदिरानगर :- भाजपचे माजी नगरसेवक यशवंत निकुळे, यांच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात अनवधानाने दाखल केलेली तक्रार डॉ राहुल धिरेंद्र सिंग,वय ३४ खाजगी नोकरी प्रोफेसर राहणार प्लाॅट नंबर ४ साई दत्त को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी आनंद नगर पाथर्डी फाटा यांनी मागे घेतली आहे.तसा जबाब त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात स्वतः उपस्थित राहुन दिला आहे. दिनांक ०५/०८/२०२५ रोजी इंदिरानगर परिसरातील स्वामी समर्थ बँकेच्या समोर डेकेअर शाळेच्या रस्त्याजवळ डॉ राहुल धिरेंद्र सिंग यांची अक्टीव्हा स्कुटर,माजी नगरसेवक यशवंत केशव निकुळे,यांच्या एर्टीगा कार मध्ये किरकोळ अपघात झाला होता.दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर याप्रकरणी डॉ राहुल धिरेंद्र सिंग,यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनसी तक्रार १२६३/२०२५ दाखल केली होती.सदरची तक्रार मी अनवधानाने दाखल केली होती आम्ही आपसात बसून वाद मिटवला आहे. याप्रकरणी माझी कुठलीही तक्रार नाही असं डॉ राहुल धिरेंद्र सिंग यांनी जबाबात नमुद केले आहे.किरकोळ अपघात,शाब्दिक वाद गैरसमजातून दाखल तक्रार मागे घेतल्याने याप्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.

वृद्धेच्या कानातील गाठ काढण्यात मविप्र रुग्णालयातील डॉक्टरांना यश,गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली यशस्वी

Image
नाशिक :- वर्षभरापासून उजव्या कानातील वेदनांनी त्रस्त असलेल्या ७९ वर्षीय वृद्धेवर आडगांव येथील मविप्र संचलित डॉ. वसंतराव पवार रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या कानाच्या वेदना शमविण्याचे काम केले आहे.मविप्र रुग्णालयाच्या कान-नाक-घसा तज्ज्ञ विभागात ही अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश आले, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत कवडे,यांनी दिली. इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या प्रभाकर ठाकरे यांच्या मातोश्री सुमन ठाकरे,या गेल्या वर्षभरापासून उजव्या कानातील प्रचंड वेदनांनी त्रस्त होत्या.सतत कान बंद जाणवणे, श्रवणशक्ती कमी होणे आणि कानात वेदना होणे हा त्रास त्यांना जाणवत होता.विविध स्थानिक रुग्णालयांत उपचार करूनही आराम न मिळाल्याने त्यांना आडगाव येथील मविप्र रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला होता.मविप्र रुग्णालयात यशस्वी उपचार होतील व वेदना दूर होतील, असा आत्मविश्वास देण्यात आल्याने सुमन ठाकरे यांना मविप्र रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागात दाखल करण्यात आले.डॉक्टरांना तपासणीअंती रुग्णाच्या उजव्या बाह्य श्रवण...

मखमलाबाद विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन,जागतिक आदिवासी दिन,संस्कृत दिन व रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

Image
मखमलाबाद विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन, संस्कृत दिन व रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक पुंडलिकराव खोडे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर, पर्यवेक्षक संजय हांडगे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी नाशिक मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे ऑगस्ट क्रांती दिन,जागतिक आदिवासी दिन,संस्कृत दिन व रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पुंडलिकराव खोडे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविक केले.कु.मयुरी ठाकरे,कु.लावण्या आहेर यांनी ऑगस्ट क्रांती दिनाबद्दल सविस्तर माहिती दिली.९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टॅंक येथे महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली. याच दिवशी गांधीजींनी "करा किंवा मरा" ह...

साईनाथ नगर भागात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरीक त्रस्त

Image
नाशिक इंदिरानगर :-  जॉगिंग ट्रॅक ते साईनाथ नगर वर्दळीच्या रस्त्यावर चिखल,ऑइल पडल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे.येथून मार्ग क्रमण करत असताना दर दिवशी दुचाकीस्वार घरंगळून पडून मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहे अनेक वाहनधारक रुग्णालयात उपचार घेत आहे. साईनाथ नगर सिग्नल कडून इंदिरानगर अंडरपास कडे जात असताना सिग्नलच्या पासून पुढे पन्नास फुटावरच रस्त्या वरुन जाये करणारे बांधकाम साहित्याचे मालवाहू ट्रकचा चिखल ऑइल हे रस्त्यावर पडल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे.येत्या दोन दिवसात हा रस्ता धुवून स्वच्छ खड्डे मुक्त करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा येथील वाहनधारकांसह संजय गायकर,संतोष गोवर्धने, धीरज भोसले, प्रवीण वालझाडे,आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याठिकाणी पाणी साचत आहे.खड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे.वाहनधारकांनाजीव मुठीत धरून या ठिकाणाहून मार्गक्रमण करावे लागत आहे. खड्डे पडल्याने अपघात होत आहे. रस्त्या उंच सखल झाल्याने रस्ता गुळगुळीत झाला आ...

बालनाट्य दिनानिमित्त विविध उपक्रम विद्यार्थ्यांचा गौरव

Image
नाशिक - बालनाट्य दिवसाचे निमित्तानेबालरंग भूमी परिषद नाशिक शाखा आणि ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकलाकारांच्या हक्काचा हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी बालकलाकारांनी माझ्या पप्पांनी गणपतीआणला, डम डम डमरू वाजे या गाण्यांवर नृत्य करून लहानग्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले,तर पाणीटंचाई, मुक्ताबाई यां सारख्या विषयांवर एकपात्री अभिनय सादर करून बाल कलाकारांनी सगळ्यांचीच वाहवा मिळवत हक्काचा हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 'बालकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणे,तसेच त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणारे बाल प्रेक्षक निर्माण करणे' हे उद्दिष्ट मराठी बालनाट्य सोहळ्याने साध्य झाले.आपल्या हक्काचा एक दिवस मिळतो आहे, याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. याप्रसंगी बालरंगभूमी परिषद नासिक शाखेच्या अध्यक्षा डॉ.आदिती मोराणकर,उपाध्यक्ष जयदीप पवार,ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक संस्थेचे सचिव गोपाळ पाटील,राजेश भुसारे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र कदम...