कळवण मर्चंन्ट को ऑप बँक कळवण -उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री मा. ना. अजित पवार यांच्या शुभ हस्ते क्यू. आर. कोड चा शुभारंभ
कळवण :- तालुक्याची अर्थवहिनी असलेल्या कमको बँकेने डिजिटल च्या जमान्यात आपण कुठे ही मागे राहू नये ह्या स्पर्धात्मक युगात आपली बँक सतत अग्रेसर राहावी या दृष्टिकोनातून क्यू आर. कोड आपला स्वतः चा असावा ग्राहकास जास्तीत जास्त सुविधा देता याव्यात ह्या हेतूने क्यू आर कोडचा उपक्रम हाती घेतला बँक म्हंटली कि वितीय विषय असतो म्हणून महाराष्ट्र राज्याचे वित्त मंत्री मा. ना. अजित दादा पवार यांच्या हस्ते क्यू आर. कोडचे दिमाखात शुभारंभ करण्यात आला. विशेषतः अजित दादा समवेत निफाड चे आमदार दिलीप बनकर, दिंडोरीचे आमदार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कळवणचे आमदार नितीन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस चे नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार हजर होते बँकेच्या कामकाजची माहिती दादांनी जाणून घेतल्यावर नेट एन पी ऐ शून्य झाल्याबद्दल तसेच बँकेची प्रगती बघून समाधान व्यक्त केले. दादा चा सत्कार बँकेचे चेअरमन व समर्थ नेतृत्व असणारे गजानन आण्णा च्या हस्ते करण्यात आला. त्याचें स्वागत व प्रस्तावना मा व्हा चेअरमन व संचालक दिपक वेढणे यांनी केले यावेळी व्हा. चेअरमन रंगनाथ बाबा देवघरे जनसंपर्क संचालक डॉ डी. एल मुर्तडक, नेते संजय नाना मालपूरे, जेष्ठ संचालक प्रवीण संचेती सर मा. चेअरमन योगेश महाजन, सुभाष बापू शिरोरे, नितीन वालखडे, सागर शिरोरे,लक्ष्मण खैरनार, सतीश कोठावदे, बापू अमृतकर, विनोद मालपूरे, पोपट दादा बहिरम, शालिनीताई महाजन, भारतीताई कोठावदे, प्रभाकर काका विसावे मुख्य व्यस्थापक कैलास जाधव, वसुली अधिकारी प्रवीण घुगे, प्रवीण खैरनार, सुहास भावसार, प्रसन्न गायधणी विलास अमृतकर आदी सह सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच गावातील जेष्ठ व प्रतिष्टीत नागरिक हजर होते.
Comments
Post a Comment