रेडक्रॉस आयोजित हृदयरोग व मधुमेह निदान शिबिरास उदंड प्रतिसाद

नाशिक : श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी नाशिक जिल्हा शाखेने विनयनगर परिसर ज्येष्ठ नागरिक मंच व सीतावल्लभ बहुद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने घेतलेल्या हृदयरोग व मधुमेह निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कै.जयप्रकाश छाजेड उद्यान,दीपालीनगर येथे संपन्न झालेल्या या शिबिराचे उदघाटन मा. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी होते.व्यसपिठावर मा.नगरसेवक यशवंत निकुळे, डॉ. सुनील औंधकर , संजय गिते , मेजर पी. एम. भगत , डॉ. चंद्रशेखर नामपूरकर , डॉ. प्रतिभा औंधकर , पंडितराव नेरे, साहेबराव सोनवणे , ओंकार जगळे, रीमा गुलाटी , डॉ. संदीप सुतार,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. शैलेश बडवर आणि सहकाऱ्यांनी केलेल्या मोफत रुग्णतपासणी बरोबरच साखर , ईसीजी, सरासरी साखर इ. तपासण्या विनामूल्य करण्यात आल्या.शिबिराचा लाभ २७५ हुन अधिक रुग्णांनी घेतला. दरम्यान डॉ. धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवर, संस्थांच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात आले.शिबिर यशस्वितेसाठी संतोष आहेर , तुषार जाधव, सचिन चव्हाण,चंद्रकांत गोसावी , मंगल कस्तुरे यांनी प्रयत्न केले. रेडक्रॉस , साईबाबा हॉस्पिटल , विनयनगर ज्येष्ठ नागरिक मंच, सीतावल्लभ बहुद्देशीय संस्था आदींच्या विद्यमाने दीपालीनगर येथे आयोजित आरोग्यशिबिराचे उदघाटन करतांना मा.महापोर सतीश कुलकर्णी दुसऱ्या छायाचित्रांत डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे अभिष्टचिंतन करतांना यशवंत निकुळे, डॉ. सुनील औंधकर , संजय गिते , मेजर पी. एम. भगत , डॉ. चंद्रशेखर नामपूरकर , डॉ. प्रतिभा औंधकर , पंडितराव नेरे, साहेबराव सोनवणे , ओंकार जगळे, रीमा गुलाटी , डॉ. संदीप सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला