श्रावण सोमवार निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे महाप्रसाद वाटप
पंचवटी :- कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक पंचवटी येथील जय भोले वेजिटेबल ऑर्डर सप्लाय कंपनी गळा नंबर 24 मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त पंचवटी मुख्य मार्केट यार्ड येथे खिचडी महाप्रसाद केळ वाटप व लाडू वाटप भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हिरामण खोसकर,शिवसेना उपनेते सुनील बागुल, नगरसेवक कमलेश बोडके, संजू बुटे, राजाभाऊ वाघले, विनायक माळेकर,चांदुभाऊ साडे, दिपक गायकवाड, आबा भाडागे, एकनाथ मुर्तडक,गोपाळ लहांगे, संतोष भाडमुखे,तानाजी धात्रक, पंडित कातोरे, अशोक आहेर, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल आहेर, गोकुळ आहेर, संतोष कालेकर, धनंजय चोथे, जालिंदर आहेर, कृष्णा कलेकर, बारकू चांगले,गुलाबराव रणमाळे,भाडमुखे यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment