मखमलाबाद विद्यालयाच्या कलाशिक्षिका स्मिता मुळाणे यांचा गौरव
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथील कलाशिक्षिका स्मिता मुळाणे यांनी ३x३ से.मी.साईजच्या कागदावर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनप्रवास २४ वारली चित्रांद्वारे अवघ्या ३२ मिनीटे ४१ सेकंदात पूर्ण केला.त्यांच्या या कलाकृतीची नोंद "वर्ल्ड वाईड बुक आॅफ रेकाॅर्डस" यांनी घेतली आहे.त्यांच्या या जागतिक विक्रमाबद्यल मविप्र संचालक रमेश पिंगळे,कर सल्लागार प्रकाश सोनवणे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समाजदिनाच्या मुख्य कार्यक्रमात खा,सुप्रिया सुळे,मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे,खा. राजाभाऊ वाजे,खा.शोभाताई बच्छाव,मविप्र अध्यक्ष सुनिल ढिकले,सभापती बाळासाहेब क्षिरसागर,संचालक रमेश पिंगळे.डाॅ.अशोक पिंगळे यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.याप्रसंगी सर्व स्कुल कमिटी अध्यक्ष,सदस्य,सभासद,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,नरेंद्र मुळाणे,सचिन गरड,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment