पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
नाशिक :- हिंदू धर्मक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने नाशिक रामकुंड गोदावरी नदी काठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या २२९व्या पुण्यतिथी निमित्त हिंदूधर्म रक्षक राजमाता गोदाआरती समर्पित करुन अहिल्यादेवींना त्यांच्या २२९ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. समितीमार्फत मातोश्रींच्या जन्मोत्सवापासून, पुण्यतिथी पर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आली. यावेळी हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समितीच्या वतीने अहिल्या घाट पंचवटी याठिकाणी मातोश्रींच्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्या आरती गंगा गोदावरी आरती करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी या आरतीत सहभाग घेतला. माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, यांनी पुण्यतिथ निमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी पुरोहित महासंघाचे सतीश शुक्ला, यांनी रामकुंड पंचवटी अहिल्या घाट, परिसराचे महत्व सांगितले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कोथमिरे, विनायक काळदाते, दत्तू बोडके, शिवाजी ढगे,वैभव रोकडे,भूषण जाधव, राजाभाऊ बादाड, अमोल गजभार,देवराम रोकडे, नाशिक शहर प्रमुख शाम गोसावी, डॉ.कल्पेश शिंदे पंढरीनाथ कोरडे,रामेश्वर भाऊ खनपटे, आदींसह समाजबांधव नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment