पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळालेल्या अधिका-यांचा सत्कार सोहळा
नाशिक :- शहरात कार्यरत पोलीस अंमलदार यांना पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.पदोन्नती मिळालेल्या उपनिरीक्षकांचा संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त - नाशिक शहर आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पोलीस आयुक्तालयात पार पडला.
शहरात कार्यरत अशा एकुण ७३ पोलीस अंमलदारांनी नाशिक शहर पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी पोलीस आयुक्त कर्णिक यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment