बिजनेस क्विझ राष्ट्रीय स्पर्धेत मविप्र आयएमआरटीच्या विद्यार्थिनींचा द्वितीय क्रमांक
नाशिक :- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट नाशिक शाखेच्या वतीने नाशिक शहरातील व्यवस्थापन शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित बिजनेस क्विझ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाज संचलित आयएमआरटी व्यवस्थापन संस्थेच्या ऐश्वर्या सांगळे व हेमांगी शिंदे या एमबीए द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नाशिक शहर व जिल्ह्यातील बहुतांश मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटसने सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेसाठी एकूण तीन फेऱ्या पार पडल्या. यात आयएमआरटीच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत तिसऱ्या फेरीअखेर यश मिळविले.
याबद्दल ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, सर्व संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
Comments
Post a Comment