स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यासिका येथे ध्वजारोहण संपन्न


इंदिरानगर | 15ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यासिका, पेठेनगर, जाखडीनगर ध्वजरोहन राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ समाजसेवक वसंतराव जगताप यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपनिबंधक संजय गीते,पत्रकार बाबा खरोटे, सागर चौधरी,तुषार जगताप, दिलीप सूर्यवंशी,हिरालाल लोथें याचे सह परिसरातील विविध सोसायट्याचे ज्येष्ठ पदाधिकारीआर.आर. राऊत,प्रकाश कुलकर्णी, नारायण यादव,अवधूत कुलकर्णी,शीतल शिंदे, सुशीला सारंग,अरुण मनशेट्टीवार,दिलीप गुंजाळ, सुनील खोडे,सुनील राऊत, आदी सह इंडिया बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या इंदिरानगर येथील रहिवाशी सूक्ष्म कलाकार ऐश्वर्या औसरकर यांच्या हस्ते भारत माता पूजन करण्यात आले.उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक अभ्यासिकेचे संस्थापक, अध्यक्ष तथा माजी सभागृह नेते चंद्रकांत खोडे यांनी केले.यावेळी औसरकर याचा अभ्यासिकेच्या वतीने इंदिरानगरभूषण कन्या म्हणून गौरवचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अभ्यासिका उपाध्यक्ष प्रदीप जगताप, यांनी केले.आभार अभ्यासिका सचिव संकेत खोडे, यांनी मानले. दरम्यान अभ्यासिकेच्या प्रांगणात औसरकर, यांनी तयार केलेल्या सूक्ष्म कला कृतीच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन खोडे याचे हस्ते करण्यात आले.यावेळी मनोगत व्यक्त करताना औसरकर यांनी सांगितले की स्त्रिच्या कर्तुत्वाला योग्य सन्मान मिळाला माझा गौरव म्हणजे स्त्रिचा सन्मान हीच आपली खरी संस्कृतीअसून माझ्या कलेची घरातील माणसानी दखल घेऊन सर्वसामान्य स्त्रिचा गौरव हा अविस्मरणीयआहे. त्यामुळे माझ्या अंगी असलेल्या कलेला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळाले असे मत व्यक्त केले. यावेळी प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील कलाकारांनी, नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी सूक्ष्म कलारसिक यांनी मोठी गर्दी केली होती.ही कला भिंगाणेही पाहणे अशक्य होत असल्याने दोऱ्यावर इतर सूक्ष्म कडधान्यवर काढलेल्या कलाकृती पाहून सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त करून अनोख्या कलेचे प्रदर्शन असल्याचा अनुभव व्यक्त केला.कार्यक्रम व प्रदर्शन यशस्वीततेसाठी सारथी खोडे,अक्षय बोरसे,मयूर शिंदे,ऋषिकेश कुंदे, सुदर्शन खोडे,राहुल काश्मिरे, चैतन्य कुंटे,योगेश कराड, आकाश भालेराव, रोहन वारघडे आदीसह अभ्यासिकेतील विद्यार्थीनी विशेष परिश्रम घेऊन संपन्न केला.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला