२० हजार लाचेची मागणी भोवली पोलीसावर गुन्हा दाखल
नाशिक :- सातपुर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई अनंता बळवंत महाले यांनी २० हजार लाचेची मागणी केली असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. सातपुर पोलीस ठाणे हद्दीतील एका भंगार दुकानदारांच्या भावाला चौकशी साठी ताब्यात घेऊन, भंगार दुकानदाराला मोबाईल फोन द्वारे संपर्क साधत तुमच्या भावाच्या विरोधात गुन्हा दाखल होईल तुम्ही २५ हजार रुपये गुन्हा दाखल न करण्यासाठी द्यावे अशाप्रकारे लाचेची मागणी पोलीस शिपाई अनंता महाले यांनी केली होती याप्रकरणी तक्रारदार भंगार दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक संपर्क साधत तक्रार केली असता पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर अधीक्षक माधव रेड्डी नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली.२० हजार लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस शिपाई अनंता महाले नेमणूक सातपुर पोलीस ठाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment