लासलगाव महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी वृषाली गांगुर्डे यांची पोलीस उपनिरीक्षक पदास गवसणी

लासलगाव :-  येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी कुमारी वृषाली रमेश गांगुर्डे हिची 2018 मध्ये सी.आर.पी.एफ दलात त्यानंतर 2019 मध्ये पोलीस दलात निवड झाली यावर तिचा प्रवास थांबला नाही तिने स्पर्धा परीक्षा देत मंत्रालय क्लर्क व नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील दिघवद येथील लासलगाव महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी वृषाली रमेश गांगुर्डे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदास गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल वृषालीचा गुणगौरव सोहळा व कनिष्ठ महाविद्यालय, राज्यशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक उज्वल शेलार, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य हसमुखभाई पटेल,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे इ. उपस्थीत होते. महाविद्यालय परिवारातर्फे संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी वृषालीचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व महाविद्यालयाचे नक्षत्र भेट देऊन सत्कार केला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य, उपप्राचार्य व अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतातून वृषालीच्या संघर्षाचे कौतुक करत, वृषालीने महाविद्यालयाच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवण्याचे काम केलं त्याचबरोबर वृषालीसाठी तुम्ही सर्व विद्यार्थी जशा टाळ्या वाजवत आहात तसेच तुमच्यासाठीही इतरांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे असं कार्य आपण केलं पाहिजे असे गौरवोद्गार काढले. तसेच वृषालीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण आपल्या जीवनाचे दोन वर्ष जर चांगली मेहनत घेतली तर तुम्हाला तुमच्या यशापासून कोणीही रोखू शकत नाही व तुमचे पुढील आयुष्य आनंदी व सुखकर होईल असे सांगीतले. जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकतात. यासाठी फक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोणताही क्लास न लावता स्वतः अभ्यासाचे योग्य नियोजन करून दिवसातून जवळपास आठ ते दहा तास अभ्यास केल्यास हे शक्य असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  किशोर गोसावी, सूत्रसंचालन  प्रभाकर गांगुर्डे तर आभार महेश होळकर यांनी मानले. या कार्यक्रमास ग्रंथपाल गुरुदेव गांगुर्डे, श्रीमती दिपाली कुलकर्णी, सुनिल गायकर,  जितेंद्र देवरे,  गणेश जाधव, श्रीमती अनुया नवले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला