लासलगाव महाविद्यालयात रक्तदान शिबिर हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन

लासलगाव :- येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे जनरल सेक्रेटरी  गोविंदराव होळकर यांच्या रौप्य महोत्सवी कारकिर्दी निमित्त राष्ट्रीय सेवा योजना व +२ स्तर, राष्ट्रीय छात्र सेना आणि माजी विद्यार्थी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ४३ रक्तदात्यांनी रक्तदान‎ करून शिबिर यशस्वी केले.‎ याप्रसंगी संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींची मोफत हिमोग्लोबिन तपासणी देखील करण्यात आली. तसेच याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपस्थित होते.

तसेच संस्थेचे जनरल सेक्रेटरी  गोविंदराव होळकर, हसमुखभाई पटेल, अॅड.संदीप होळकर, सचिन मालपाणी, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे, पर्यवेक्षक  उज्वल शेलार, जनकल्याण रक्तपेढी नाशिक चे डाॅक्टर व त्यांची संपूर्ण टिम, निमगाव वाकडा आरोग्य केंद्राचे डॉ.प्रशांत राठोड व त्यांची टीम, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.उज्वला शेळके, डॉ.संजय शिंदे, प्रा.मारुती कंधारे, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर, लेफ्टनंट बापू शेळके, इत्यादी उपस्थित होते. यावेळी प्रा.मारुती कंधारे यांनी सूत्रसंचालन केले. उज्वल शेलार यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तसेच प्रा.सुनिल गायकर, यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी  गोविंदराव होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी व सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला