निपमतर्फे आयोजित प्रिव्हेन्शन ऑफ सेक्सुयल हराशमेंट (पॉश) प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन



नाशिक :- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट(निपम)तर्फे वतीने महिला सक्षमीकरण तसेच मनुष्यबळ विकास व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार असल्याचे प्रतिपादन निपमचे अध्यक्ष राजाराम कासार यांनी केले.  
      निपमतर्फे आयोजित प्रिव्हेन्शन ऑफ सेक्सुयल हराशमेंट (पॉश) प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन राजाराम कासार , डाॅ.उदय खरोटे व कमेटी सदस्य यांच्या हस्ते हॉटेल सेवन हेवन येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.          अध्यक्षस्थानी डॉ.उदय खरोटे तर व्यासपीठावर निपमचे उपाध्यक्ष राहुल बोरसे,विनायक पाटील,चिटणीस प्रकाश गुंजाळ,सहचिटणीस राजेंद्र आचारी,खजिनदार सुस्मित दळवी, तसे कार्यकारी सदस्य मनोज मुळे,श्रीकांत पाटील,विनेश मोरे, गोविंद बोरसे,ब्रिजेश जाधव,यादवी पवार,हर्षदा सोनवणे , रामेश्वर थोरात आदी होते. 
अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्राच्या कार्यपद्धतींत जलदगतीने बदल होत आहे.त्याला सामोरे जाण्यास एचआर व्यवस्थापकीय अधिकारी व त्यांच्या विकासासाठी वर्षभर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात निपंम पुढाकार घेणार असेही ते पुढे म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या कीया राजे यांनी  प्रिव्हेन्शन ऑफ सेक्सुयल हरॅशमेंट कायद्याच्या नियमांबद्दलची जागरूकता विषयी मार्गदर्शन केले.महिलांच्या संरक्षणाविषयक कायद्यात अनेक बाबींची तरतूद करण्यात आली आहे.महिलांना त्याबाबतची माहिती असणे गरजेचे आहे. असे  सांगून त्यांनी या कायद्याच्या अनेक बाबींवर प्रकाश टाकला. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ उदय खरोटे, यांनी निपमच्या नाशिक शाखेच्या कार्याचे कौतुक केले.निपमतर्फे मंगळागौरीसारखे उपक्रम राबवले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून अन्य प्रशिक्षण कार्यक्रमांंबरोबर विविध सामाजिक उपक्रमांनाही न्याय द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.                  
नॅशनल इन्स्टिट्यूट  पर्सोनेल मॅनेजमेंट या राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन मंगळूर येथे करण्यात आले आहे.त्या अनुषंगानेच राष्ट्रीय सुरक्षा प्रश्नमंजुषेचा एक भाग म्हणून नाशिक चॅप्टरने संदीप फाऊंडेशन,मराठा विद्या प्रसारक आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ भुजबळ नॉलेज सिटी आणि  विविध संस्थांमधील एचआर विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक वितरण निपमचे माजी अध्यक्ष एस.एस.खैरनार, विश्वनाथ डांगरे,डॉ.श्रीधर व्यवहारे,जनार्दन शिंदे, सुधीर पाटील आणि प्रकाश बारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गार्गी ग्रूपतर्फे सर्व महिलांसाठी पारंपरिक मंगळागौर कार्यक्रम सादर करण्यात आला. 100 हून अधिक  महिलांनी त्याचा आनंद लुटला.यादवी पवार, यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.सूत्रसंचालन गितिका पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकांत पाटील,केले. कार्यक्रमास निपमचे दीडशेहून अधिक आजी-माजी पदाधिकारी तसेच  मनुष्यबळ विकास व्यवस्थापकीय अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनेश मोरे,सौ.हर्षदा सोनवणे , राजेंद्र आचारी ,यादवी पवारआदींनी  विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन